राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती 6 ते 9 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर
Posted On:
05 DEC 2021 8:58PM by PIB Mumbai
राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद उद्यापासून म्हणजेच, 6 ते 9 डिसेंबर 2021 दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत.
6 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रपती रायगड किल्ल्याला भेट देतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आदरांजली अर्पण करतील.
7 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रपती, भारतीय हवाई दलाचा तळ, लोहगाव, पुणे येथे भेट देतील. तिथे ते हवाई कसरतींची (फ्लाईंग डिस्प्ले ) पाहणी करतील तसेच हवाई दलातील योद्ध्यांशी संवाद साधतील.
8 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रपती मुंबईत क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेवरील 22 व्या तुकडीला राष्ट्रपती प्रेसिडेंट'स स्टॅंडर्ड हा विशेष सन्मान प्रदान करतील.
***
R.Aghor/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1778306)
Visitor Counter : 270