पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

ब्रँड इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी 20 दूतावासांमध्ये पर्यटन अधिकाऱ्यांची नियुक्ती: केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी


भारतातील आघाडीची 75  स्थळे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार  विकसित केली जाणार : पर्यटन मंत्री

“पर्यटन क्षेत्राला अधिक गतीने पुनरुज्जीवित करण्यासाठी पात्र व्यक्तींचे  दोन्ही मात्रांचे  लसीकरण पूर्ण करा”: केंद्रीय मंत्र्यांचे  आवाहन

Posted On: 04 DEC 2021 7:24PM by PIB Mumbai

 

गेल्या महिन्यात विविध देशांच्या 20 दूतावासांमध्ये पर्यटक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.'' केंद्रीय पर्यटन, संस्कृती आणि विकास मंत्री  जी किशन रेड्डी यांनी आज गोव्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  ''भारताला एक पर्यटनस्थळ म्हणून उदयाला आणण्यासाठी  तसेच ज्या देशातून  भारतात सर्वाधिक पर्यटक येतात त्या देशातील पर्यटकांना अधिक सुविधा देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ज्या देशातून पर्यटक भारतात येतात त्या सर्व देशांच्या दूतावासांमध्ये पर्यटन उपविभाग कार्यालये उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांना मदत करण्यासाठी पर्यटन मंत्रालय हे आरोग्य विभाग, नागरी विमान वाहतूक विभाग, गृह आणि परराष्ट्र व्यवहार विभाग यांच्याशी समन्वय  साधून काम करत आहे.

 

गोव्यातील पर्यटन उपक्रम

गोवा आपल्या मुक्तीची 60 वर्षे साजरी करत असताना, सरकार राज्यातील पर्यटन पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.   बहुतांश जागतिक वारसा स्थळे असलेल्या पर्यटन क्षेत्रातील प्रमुख राज्यांपैकी गोवा हे एक आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी मंत्रालयाने गोव्याकडे विशेष लक्ष देण्याचे ठरवले आहे. असे रेड्डी यांनी सांगितले.  जास्तीत जास्त पर्यटक मग ते देशांतर्गत असोत  किंवा आंतरराष्ट्रीय पर्यटक गोव्याला वारंवार भेट देतात.  पर्यटनाचा एक क्षेत्र म्हणून राज्यावर कसा मोठा प्रभाव आहे, ते त्यांनी सांगितले.

सागरमाला प्रकल्पाअंतर्गत क्रूझ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालय हे  रेल्वे मंत्रालय, नागरी विमान वाहतूक  आणि जहाजबांधणी मंत्रालयाच्या सहकार्याने काम करत असल्याचे रेड्डी यांनी सांगितले. ते म्हणाले, क्रूझ पर्यटन अभियान स्तरावर विकसित केले जाईल ज्याचा गोव्याला खूप फायदा होईल. क्रुझ पर्यटनाच्या  माध्यमातून चेन्नई, विशाखापट्टणम आणि अंदमानला गोव्याशी जोडण्याची योजना असल्याची माहितीही त्यांनी दिली.

साहसी पर्यटन आणि पर्यावरण पर्यटनात असलेला वाव  आणि दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाविषयीही त्यांनी माहिती दिली.

 

भारतातील आघाडीची 75  स्थळे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार  विकसित केली जातील

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या खर्चाचा मोठा भाग विविध पर्यटन स्थळे आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या विविध लोकप्रिय पर्यटन सर्किटमधील  पर्यटनाशी संबंधित दर्जेदार पायाभूत सुविधांच्या विकासावर खर्च होतो, असे रेड्डी यांनी सांगितले.  देशाच्या स्वातंत्र्याची  75 वर्ष साजरी करण्यासाठी  देशातील आघाडीची  75 स्थळे  आंतरराष्ट्रीय मानकांनुसार  विकसित केली जाणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.  सर्व विभागांनी यावर आपल्या प्रतिक्रिया कळवल्या आहेत . मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर 75 ठिकाणे  आंतरराष्ट्रीय मानकांनुसार विकसित करण्यासाठी काम वेगात  सुरू होईल, असे रेड्डी यांनी  सांगितले.

पर्यटन क्षेत्राच्या स्थिर वाढीसाठी  लसींच्या दोन मात्रांचे  लसीकरण पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. पात्र व्यक्तींनी  कोविड-19 लसीच्या  दोन मात्रा  घेऊन  पूर्णपणे लसीकरण करून घ्यावे. यामुळे पर्यटन क्षेत्राला अधिक गतीने पुनरुज्जीवन करण्यास मदत होईल.  शहरांमध्ये तसेच खेड्यांमध्ये लाभार्थ्यांचे जास्तीत जास्त लसीकरण कसे होईल, हे पाहावे ही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना विनंती आहे, ते म्हणाले.

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग व  पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद वाय. नाईक यांनी गोव्यात पूर्ण झालेल्या आणि सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली.

***

Jaydevi PS/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1778087) Visitor Counter : 152


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi