सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री उद्या गुजरातला भेट देणार
Posted On:
03 DEC 2021 8:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2021
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई ) मंत्री नारायण राणे उद्या गुजरात मधील अहमदाबाद येथे एमएसएमई विकास संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. ते ईडीआयआय ( EDII ) येथे इनोव्हेटर्स/स्टार्ट अप पुरस्कार देखील प्रदान करतील. लूम टू मॉल' वरील जागतिक उद्योजकता निरीक्षण अहवाल या पुस्तिकेचे देखील ते प्रकाशन करतील आणि एमएसएमई स्पर्धात्मकतेवरील व्हर्चुअल आंतरराष्ट्रीय परिषदेचेही उद्घाटन करतील. त्यानंतर राणे ईडीआयआयच्या ग्रंथालय आणि प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करतील, तसेच तेथील एमएसएमई प्रदर्शनाला भेट देतील.
ते गांधीनगर येथे एमएसएमई प्रदर्शन 'Engimatch'चे उद्घाटन करतील आणि माध्यमांना संबोधित करतील.
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1777844)
Visitor Counter : 190