वस्त्रोद्योग मंत्रालय

सुमारे 1714 भारतीय हातमाग ब्रँडची नोंदणी


आयएचबी उत्पादनांसह, इतर हातमाग उत्पादनांच्या ई-विपणन प्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी 23 ई-वाणिज्य संस्थांचा सहभाग

ई-वाणिज्य पोर्टलद्वारे एकूण 134.35 कोटी रुपयांच्या विक्रीची नोंद

Posted On: 03 DEC 2021 5:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2021

उच्च दर्जाच्या, निर्दोष आणि वातावरणावर कोणताही दुष्परिणाम न करणाऱ्या शुध्द हातमाग उत्पादनांचे ब्रँडिंग आणि जाहिरात करण्यासाठी आयएचबी अर्थात भारतीय हातमाग ब्रँडची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत सुमारे 1714 ब्रँडची नोंदणी करण्यात आली असून त्यांची राज्यनिहाय नोंदणी आकडेवारी परिशिष्ट-I मध्ये दिली आहे. खासगी उद्योगांद्वारे मोठ्या  प्रमाणात आयएचबी उत्पादनांची विक्री केली जात असून या हातमाग उद्योगांनी त्यांच्या विक्रीविषयीची आकडेवारी जाहीर करणे ऐच्छिक आहे. या उद्योगांनी 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत 1102.69 कोटी रुपयांची विक्री झाल्याचे जाहीर केले आहे.

आयएचबी उत्पादनांसह इतर सर्व हातमाग उत्पादनांच्या ई-विपणनाला प्रोत्साहन देण्याकरिता 23 ई-वाणिज्य संस्थांना सहभागी करून घेण्यात आले आहे. या ई-वाणिज्य पोर्टल्सच्या माध्यमातून 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत 134.35 कोटी रुपयांच्या उत्पादनांची विक्री झाल्याची नोंद झाली आहे. आयएचबीच्या नोंदणीकृत धारकांना ब्रँडची जाहीरात करण्यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विपणन प्रदर्शने तसेच इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातून 68 ब्रँडची नोंदणी झाली आहे.

परिशिष्ट –I

State-wise registration of IHB Products

Andhra Pradesh

99

Assam

15

Bihar

169

Chhattisgarh

117

Delhi

30

Gujarat

14

Haryana

54

Himachal Pradesh

45

Jammu & Kashmir

33

Jharkhand

33

Karnataka

18

Kerala

170

Madhya Pradesh

167

Maharashtra

68

Manipur

3

Odisha

31

Rajasthan

68

Tamil Nadu

179

Telangana

189

Tripura

2

Uttar Pradesh

104

West Bengal

106

TOTAL

1714

केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोष यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

 

 

 

 

M.Chopade/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1777717) Visitor Counter : 190


Read this release in: Tamil , English , Urdu , Punjabi