युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

टोक्यो ऑलिंपिकचे विजेते करणार शाळांना भेटी देण्याच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा प्रारंभ; नीरज चोप्रा चार डिसेंबरला अहमदाबादच्या संस्कारधाम शाळेला भेट देणार

Posted On: 01 DEC 2021 6:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 डिसेंबर 2021

या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजादी का अमृतमहोत्सवाच्या वेळी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आपले ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक पदक विजेते शालेय विद्यार्थ्यांची भेट घेण्याच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा प्रारंभ करणार आहेत. भावी विजेते घडवण्यासाठी संतुलित आहार, तंदुरुस्ती आणि खेळ या महत्त्वाच्या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी ते या उपक्रमात सहभागी होणार आहेत. देशाच्या प्रत्येक घरातल्या प्रत्येकाच्या ओठावर ज्याचे नाव आहे तो टोक्यो ऑलिंपिकमधला सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा या उपक्रमाची सुरुवात करणार आहे.

गुजरातमधील अहमदाबाद शहरातील संस्कारधाम या शाळेला तो 4 डिसेंबर 1 रोजी भेट देणार आहे आणि तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. त्याच्या या भेटीची आणि विद्यार्थ्यांशी होणाऱ्या संवादाची घोषणा केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी ट्वीटरवरून केली. त्यांनी लिहिले आहे, "पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ऑलिंपिकपटूंना शाळांना भेट देण्याचे आणि संतुलित आहार, तंदुरुस्ती, खेळ आणि इतर अनेक गोष्टींच्या महत्त्वाबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे आवाहन केले होते. हा उपक्रम सुरू करण्यासाठी नीरज चोप्रा अहमदाबादमधील संस्कारधाम शाळेला 4 डिसेंबर रोजी भेट देणार आहे.

M.Chopade/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1776929) Visitor Counter : 136