गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

53,175 कोटी रुपये किंमतीचे 3,131 स्मार्ट सिटी प्रकल्प पूर्ण झाले आहेत

Posted On: 29 NOV 2021 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 नोव्‍हेंबर 2021

 

केंद्र सरकारने 25 जून 2015 रोजी 100 शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यासाठी स्मार्ट सिटी मिशन (SCM) सुरु केले. जानेवारी 2016 ते जून 2018 या कालावधीत स्पर्धेच्या 4 फेऱ्यांद्वारे शहरांची निवड करण्यात आली. 12 नोव्हेंबर 2021 पर्यंत, या स्मार्ट शहरांनी 1,84,998 कोटी रुपये किमतीच्या 6,452 प्रकल्पांसाठी निविदा काढल्या आहेत; त्यापैकी 1,56,571 कोटी रुपये मूल्याच्या 5,809 प्रकल्पांमध्ये कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. तर 53,175 कोटी रुपये किमतीचे 3,131 प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

12 नोव्हेंबर 2021 पर्यंत, केंद्र सरकारने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या स्मार्ट शहरांसाठी 27,235 कोटी रुपये जारी केले आहेत.

जानेवारी 2016 मध्ये पहिल्या फेरीत निवडलेल्या 20 स्मार्ट शहरांमधील प्रकल्पांची स्थिती पुढीलप्रमाणे :

(कोटी रुपये )

Smart City

Tender Stage

Work Order Stage

Work Completed

Total Projects

Total Amount

No. of Projects

Amount

No. of Projects

Amount

No. of Projects

Amount

Round-1

(20 cities)

142

11,874

565

26,877

1,203

20,129

1,910

58,880

 

पहिल्या फेरीत निवडलेल्या स्मार्ट शहरांच्या स्मार्ट सिटी प्रस्तावांचा (एससीपी) भाग असलेल्या 58,880 कोटी रुपये किमतीच्या 1,910 प्रकल्पांपैकी 47,006 कोटी रुपये (80%) किमतीचे 1,768 प्रकल्प (93%) एकतर पूर्ण झाले आहेत किंवा त्यांची अंमलबजावणी सुरू आहे. स्मार्ट शहरे अभियानाच्या अंमलबजावणीचा कालावधी जून 2023 पर्यंत वाढवण्यात आला आहे आणि पहिल्या फेरीतील सर्व शहरांनी त्यांचे प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करणे अपेक्षित आहे.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री कौशल किशोर यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.


* * *

G.Chippalkatti/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1776238) Visitor Counter : 171


Read this release in: English , Urdu , Telugu