Posted On:
29 NOV 2021 7:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2021
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लिखित उत्तराद्वारे राज्य सभा सदस्यांना सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 26.06.2010 आणि 19.10.2014 पासून बाजारावर अवलंबून आहेत. तेव्हापासून सरकारी तेल विपणन कंपन्या (OMCs) त्यांच्या उत्पादनांच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमती, विनिमय दर, कर रचना, देशांतर्गत मालवाहतूक खर्च आणि दरावर परिणाम करणाऱ्या इतर घटकांचा विचार करून पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत योग्य निर्णय घेत असतात. देशातील पेट्रोलियम उत्पादनांचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील या उत्पादनांच्या दराशी निगडीत असतात. मात्र, केंद्र सरकार देशांतर्गत वितरीत होणारा स्वयंपाकाच्या गॅसचा अनुदानित दर आणि सार्वजनिक वितरण प्रणालीतील रॉकेलच्या किरकोळ विक्रीचा दर यांची नागरिकांसाठीची विक्री किंमत निर्धारित करत असते.
पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याच्या आणि ग्राहकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 4 नोव्हेंबर 2021 पासून केंद्रीय उत्पादन शुल्क अनुक्रमे 5 आणि 10 रुपये प्रती लिटरने कमी केले. परिणामी, अनेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मूल्यवर्धित कर देखील कमी केला आहे.
गेल्या तीन वर्षांतील पेट्रोलियम उत्पादनांच्या वापरावर आधारित कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या बाबतीतील स्वयंपूर्णतेचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत:
|
Self sufficiency (%)
|
|
Crude oil
|
Natural Gas
|
|
2018-19
|
16.20
|
52.70
|
|
2019-20
|
15.00
|
47.17
|
|
2020-21
|
15.60
|
45.80
|
|
2021-2022
(April– October)
|
15.00
|
50.70
|
* * *
G.Chippalkatti/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com