पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
दररोज 14.2 किलोचे 47.4 लाख एलपीजी सिलिंडर वापरले जातात
Posted On:
29 NOV 2021 4:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर 2021
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, एप्रिल-सप्टेंबर, 2021 दरम्यान, तेल विपणन कंपन्यांनी 12308 टीएमटी घरगुती आणि 995 टीएमटी बिगर घरगुती आणि विना सवलत एलपीजीची विक्री केली जी दररोज अनुक्रमे 14.2 किलोचे 47.4 लाख आणि 19 किलोचे 2.9 लाख सिलिंडर अशी आहे.
घरगुती तसेच बिगर घरगुती एलपीजी सिलिंडरमधून मिळणारा महसूल दर महिन्याला बदलतअसतो कारण किरकोळ विक्रीच्या किमती आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील उत्पादनाच्या किमती आणि चलनांच्या विनिमय दरानुसार तेल विपणन कंपन्या सूचित करतात. मात्र सरकार घरगुती एलपीजीवर 5% आणि बिगर घरगुती एलपीजीवर 18% जीएसटी आकारते.
घरगुती एलपीजीवरील अनुदान बाजारपेठांनुसार बदलते आणि लागू असलेले अनुदान विना-अनुदानित किंमतीवर रिफिल खरेदी केल्यावर थेट लाभार्थीच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जाते. अनुदानाचा भार सरकार वहन करते.
* * *
G.Chippalkatti/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1776149)
Visitor Counter : 219