संरक्षण मंत्रालय
पूर्व नौदल मुख्यालयाकडून व्हाईस अडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांनी निरोप समारंभ
Posted On:
28 NOV 2021 8:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर 2021
पूर्व नौदल मुख्यालयाने आज 28 नोव्हेबर 2021 रोजी अतिविशिष्ट सेवा पदक प्राप्त, विशेष सेवा पदकप्राप्त कमांडिंग इन चीफ व्हाईस अडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांना विशाखापट्टण येथील नौदल तळावर आयोजित एका भव्य संचलनात निरोप दिला.
व्हाईस अडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांनी बटालियनचे अवलोकन केले आणि विविध जहाजे तसेच पूर्व नौदल विभागाच्या नौदलाच्या तुकड्यांचा आढावा घेतला. त्यानंतर अतिविशिष्ट सेवा पदक प्राप्त, विशेष सेवा पदकप्राप्त व्हाईस अडमिरल विश्वजित दासगुप्ता यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. सर्व ध्वजाधिकारी आणि प्रमुख या पारंपारिक औपचारिक निरोप समारंभाला उपस्थित होते.
अतिविशिष्ट सेवा पदक प्राप्त, विशेष सेवा पदकप्राप्त कमांडिंग इन चीफ व्हाईस अडमिरल अजेंद्र बहादूर सिंग हे पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर या पदावर मुंबईत रुजू होत आहेत.


G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1775912)
Visitor Counter : 291