आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेद्वारे आतापर्यंत लसीच्या 121 कोटी 94 लाखांहून अधिक मात्रा देण्याचे काम पूर्ण


गेल्या 24 तासात, कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 82 लाख 86 हजारांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.34% आहे

गेल्या 24 तासात देशात 8,774 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 1,05,691

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (0.85%) गेले 14 दिवस हा दर 1% हून कमी आहे

Posted On: 28 NOV 2021 9:41AM by PIB Mumbai

गेल्या 24 तासाच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 82,86,058 मात्रा देण्यात आल्या असून त्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 121 कोटी 94 लाखांचा (1,21,94,71,134) टप्पा ओलांडला आहे. देशभरात 1,26,30,392 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.

 

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, कोविड प्रतिबंधक लसीच्या ज्या एकूण मात्रा दिल्या गेल्या आहेत त्यांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे

 

HCWs

1st Dose

1,03,83,416

2nd Dose

94,66,553

 

FLWs

1st Dose

1,83,78,183

2nd Dose

1,64,47,200

 

Age Group 18-44 years

1st Dose

45,43,97,807

2nd Dose

21,56,66,951

 

Age Group 45-59 years

1st Dose

18,36,80,077

2nd Dose

11,81,33,066

 

Over 60 years

1st Dose

11,50,32,531

2nd Dose

7,78,85,350

Total

1,21,94,71,134

 


गेल्या 24 तासात 9,481 रुग्ण कोविड आजारातून बरे झाले असून ( महामारीच्या  सुरुवातीपासून) आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता 3,39,98,278 इतकी वाढली आहे.

 

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर 98.34% झाला आहे.

 


केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे यांच्या शाश्वत आणि सह्योगात्मक प्रयत्नांमुळे, रोज नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या गेले सलग 154 दिवस, 50,000 हून कमी असण्याचा कल कायम आहे.

 

गेल्या 24 तासांत, 8,774 नव्या कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.


 

भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या सध्या 1,05,691 इतकी आहे. देशात सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांचे प्रमाण आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या संख्येच्या 0.31% असून मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.



कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमतेचा विस्तार करण्याचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 10,91,236 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 63 कोटी 94 लाखांहून अधिक (63,94,27,262) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

 

देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 0.85% असून गेले 14 दिवस हा दर 1% हून कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर आज 0.80% इतका आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर गेले सलग 55 दिवस 2% हून कमी आणि गेले सलग 90 दिवस 3% हून कमी राहिला आहे.



***

ST/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1775800) Visitor Counter : 235