भारतीय निवडणूक आयोग

निवडणूक व्यवस्थापन संस्थानी सर्वांसाठी उपलब्ध आणि सर्वसमावेशक निवडणूक व्यवस्था राबवावी : मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा

Posted On: 26 NOV 2021 10:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2021

भारतीय निवडणूक आयोगाने आज ‘महिला, दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांचा निवडणूकीतील सहभाग वाढवणे: सर्वोत्तम पद्धती आणि नवीन उपक्रमांची देवाणघेवाण’ या विषयावर वेबिनारचे आयोजन केले होते. भारतीय निवडणूक आयोग 3 सप्टेंबर 2019 पासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी ए-डब्ल्यूईबीचा अध्यक्ष आहे. ए-डब्ल्यूईबीच्या अध्यक्षपदाची दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, या वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. जगातल्या 24 देशांतील जवळपास शंभर प्रतिनिधी आणि 4 आंतरराष्ट्रीय संस्था आणि चार राजनैतिक अधिकारी या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते. 

ए-डब्ल्यूईबीचे विद्यमान अध्यक्ष या नात्याने, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी या वेबिनारमध्ये प्रमुख भाषण केले.या वेबिनारमुळे, जगातल्या अनेक निवडणूक व्यवस्थापन संस्थांना निवडणूक व्यवस्थापनाविषयक, उत्तमोत्तम पद्धती शिकण्याची आणि अनुभवांची देवाणघेवाण करण्याची संधी मिळाली. त्यातून, निवडणूक प्रक्रिया सर्वांसाठी उपलब्ध होण्यातील अडथळे समजून ते दूर करण्याचे उपाय लक्षात आले. निवडणूक प्रक्रिया अधिक सर्वसमावेशक करत त्यात सहभाग वाढवण्याच्या दृष्टीनेही या वेबिनार मध्ये मार्गदर्शक मिळाले, असे त्यांनी सांगितले. 

भरतातील निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यात महिलांना येणाऱ्या अडचणी आणि आव्हाने यांविषयीच्या ऐतिहासिक दृष्टिकोनाची आपल्या भाषणात दखल घेत, सुशील चंद्रा म्हणाले की स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची सात दशके आणि 17 सार्वत्रिक निवडणूका झाल्यावर, भारतात आज महिलांच्या निवडणुकीतील सहभागाचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक झाले आहे. 2019 च्या निवडणुकीत हे प्रमाण 67 % इतके होते. या बाबतीतील 1962 साली असलेली 16.71% एवढी लैंगिक विषमतेची तफावत तर भरुन निघाली आहेच, त्या शिवाय आता महिलांचे प्रमाण +0.17% नी वाढलेही आहेअसे त्यांनी सांगितले. 

खरे म्हणजे 1971च्या निवडणुकांपासून महिला मतदारांच्या संख्येत 235.72% वाढ झालेली भारताने बघितली आहे. निवडणुक आयोगाने महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी मतदान केंद्रावर महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करणे, मोठ्या संख्येने ‘संपूर्णपणे महिलांद्वारे व्यवस्थापन केले गेलेले मतदान केंद्र स्थापन करणे, मतदान केंद्रावर पाळणाघराची सोय करणे, मतदान केंद्रांवर वेगळे शौचालय आणि प्रतीक्षालय, गट स्तरावर स्थानिक सामाजिक - सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करून सुलभ नोंदणी सुनिश्चित करणे यासारखे उपक्रम राबविले, असे चंद्रा यांनी अधोरेखित केले.

G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1775465) Visitor Counter : 231


Read this release in: Urdu , English , Hindi , Telugu