आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड - 19 प्रतिबंधक लसीकरणाबाबत अद्ययावत माहिती – 314 वा दिवस


भारतातील एकूण लसीकरणाने ओलांडला 120 कोटी मात्रांचा महत्त्वाचा टप्पा

आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 74 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या

Posted On: 25 NOV 2021 9:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2021

भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने आज 120 कोटी मात्रांचा महत्त्वपूर्ण  (120,17,25,296) टप्पा ओलांडला. आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत देशभरात लसीच्या 74 लाखांपेक्षा अधिक (74,59,819)  मात्रा देण्यात आल्या. लसीकरणाच्या अंतिम अहवालाचे काम रात्री उशिरा पूर्ण झाल्यानंतर आज दिवसभरात देण्यात आलेल्या मात्रांच्या एकूण संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

आतापर्यंतच्या एकूण लसीकरण मोहिमेतील मात्रांची व्याप्ती तसेच नागरिकांच्या विविध प्राधान्यक्रम गटांमध्ये झालेल्या लसीकरणाची तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10383021

2nd Dose

9446508

FLWs

1st Dose

18377462

2nd Dose

16404907

Age Group 18-44 years

1st Dose

450246855

2nd Dose

207390815

Age Group 45-59 years

1st Dose

182677772

2nd Dose

115754422

Over 60 years

1st Dose

114403535

2nd Dose

76639999

Cumulative 1st dose administered

776088645

Cumulative 2nd dose administered

425636651

Total

1201725296

 

आज दिवसभरात पूर्ण झालेल्या लसीकरणाच्या मात्रांची एकूण व्याप्ती तसेच नागरिकांच्या विविध प्राधान्यक्रम गटांमध्ये झालेल्या लसीकरणाची तपशीलवार माहिती पुढीलप्रमाणे आहे:

 

Date: 25th November, 2021 (314th Day)

HCWs

1st Dose

143

2nd Dose

8977

FLWs

1st Dose

224

2nd Dose

19310

Age Group 18-44 years

1st Dose

1590921

2nd Dose

3589582

Age Group 45-59 years

1st Dose

401697

2nd Dose

1054788

Over 60 years

1st Dose

253530

2nd Dose

540647

1st Dose Administered in Total

2246515

2nd Dose Administered in Total

5213304

Total

7459819

 

 

कोविड-19 संसर्गापासून सर्वाधिक असुरक्षित असलेल्या वयोगटातील लोकांच्या संरक्षणासाठी लसीकरण मोहीम हे महत्त्वाचे साधन असल्याने या मोहिमेचा नियमित आढावा घेतला जात आहे आणि सर्वोच्च पातळीवरून मोहिमेचे परीक्षण केले जात आहे.

 

G.Chippalkatti/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1775162) Visitor Counter : 146


Read this release in: English , Urdu , Hindi , Manipuri