सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

मेक्सिकोच्या राजदूतांचे लक्ष खादीच्या जागतिक लोकप्रियतेने वेधून घेतले; आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील भारतीय कक्षाला दिली भेट


राजदूतांनी खादीच्या विविधतेचे केले कौतुक

Posted On: 25 NOV 2021 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2021

खादीच्या वाढत्या जागतिक लोकप्रियतेने भारतातील मेक्सिकोच्या राजदूतांचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा 2021 मध्ये भारतीय खादी कक्षाला मेक्सिकोचे राजदूत फेडेरिको सलास यांनी आज भेट दिली. त्यांनी खादीच्या जागतिक लोकप्रियतेचे कौतुक केले आणि खादी कक्षातील सेल्फी पॉइंटवर महात्मा गांधी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तैलचित्रांसह सेल्फी घेतली. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे सदस्य (विपणन) मनोज कुमार यांनी त्यांचे स्वागत केले.

राजदूतांनी पश्मिना लोकर कताई, मातीची भांडी बनवणे, लाकडी घाण्यातून तेल काढणे, अगरबत्ती आणि हस्तनिर्मित कागदाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहिले तर त्यांनी उत्कृष्ट हस्तकलायुक्त खादी, तयार कपडे, हस्तनिर्मित दागिने, विविध ग्रामोद्योग उत्पादने आणि इतर अनेक स्टॉल्सना भेट दिली. राजदूतांनी कुंभाराच्या इलेक्ट्रिक चाकावर मातीला आकार देण्याचाही प्रयत्न केला.

सालस यांनी भारतीय खादी कक्षामधील विविध प्रकारच्या उत्पादनांचे आणि खादी कारागिरांच्या उत्कृष्ट कारागिरीचे कौतुक केले. 

खादी कारागिरांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी भारतीय खादी कक्षासारखे मोठे व्यासपीठ भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात उपलब्ध करून दिल्याबद्दल मी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अभिनंदन करतो.भारत आणि मेक्सिको यांच्यात खादीचा विशेष धागा आहे आणि जगभरात खादीचा प्रचार करण्यासाठी दोन्ही देश एकत्र येण्याचे मार्ग तयार करतील, असे राजदूत म्हणाले.

G.Chippalkatti/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1775027) Visitor Counter : 187


Read this release in: Telugu , English , Urdu , Hindi