वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

पीएम गति शक्ती- BISAG-N टीमने संबंधित विभागांच्या वरिष्ठ सरकारी अधिकार्‍यांबरोबर क्षमता निर्मितीचा सराव केला

Posted On: 24 NOV 2021 9:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2021

 

पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लान BISAG-N (भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्पेस अॅप्लिकेशन्स अँड जिओइन्फॉरमॅटिक्स) ने भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) प्लॅटफॉर्ममध्ये विकसित केला आहे . यामध्ये सर्व मंत्रालये/विभागांच्या विशिष्ट कृती आराखड्याचा डेटा एका सर्वसमावेशक डेटाबेसअंतर्गत एकत्रित केला जात आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट टूल्स, डायनॅमिक डॅशबोर्ड, एमआयएस रिपोर्ट जनरेशनसह डिजिटल मास्टर प्लॅनिंग टूल म्हणून ही प्रणाली पुढे विकसित केली जाईल.

ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, BISAG-N टीम केंद्र सरकारच्या अंतर्गत संबंधित मंत्रालये आणि विभागांच्या वरिष्ठ-स्तरीय अधिकाऱ्यांबरोबर क्षमता निर्मितीचा सराव करत आहे . याचा उद्देश त्यांच्या विद्यमान/नियोजित प्रकल्पांवरील डेटा एकाच व्यासपीठावर एकत्रित करणे हा आहे. . बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, नागरी विमान वाहतूक मंत्रालय, ऊर्जा मंत्रालय, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय, दूरसंचार विभाग इत्यादींसाठी हा सराव आधीच हाती घेण्यात आला आहे

राष्ट्रीय मास्टर प्लॅनच्या अद्ययावतीकरणासाठी या सरावामुळे संबंधित विभाग आणि BISAG-N यांच्यात डेटाची देवाणघेवाण होईल.. या अभ्यासामुळे विभागांना GIS टूलची अधिक चांगली माहिती मिळण्यास मदत होईल आणि इतर पायाभूत प्रकल्पांच्या समन्वयाने त्यांच्या प्रकल्पांना प्राधान्य देण्यास आणि वेळेचे नियोजन करण्यास मदत होईल. . यामुळे लॉजिस्टिकची कार्यक्षमता वाढेल आणि पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्थेची स्पर्धात्मकता सुधारेल

पायाभूत सुविधा मंत्रालये राष्ट्रीय मास्टर प्लॅन पोर्टलमध्ये विद्यमान आणि प्रस्तावित पायाभूत सुविधांचे अद्ययावतीकरण सुनिश्चित करत आहेत. तसेच , वित्त मंत्रालये देशातील विद्यमान आर्थिक क्षेत्रे अद्ययावत करत आहेत.

या सरावामुळे पायाभूत सुविधांमधील तफावत आणि आर्थिक क्षेत्रांची गरज ओळखण्यास मदत होईल

सर्व आर्थिक मंत्रालयांना असे प्रकल्प मिशन मोडमध्ये हाती घेण्यासाठी पायाभूत सुविधांमधील तफावत दूर करण्याची सूचना करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांकडून डेटा अपडेट करण्याचे काम महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्रीज अँड इंटरनल ट्रेड (DPIIT)ने पुढील दोन महिन्यांत देशातील सर्व राज्यांसाठी अशा प्रकारच्या सरावासाठी 6 क्षेत्रीय परिषदा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

 

 

 

 

 

 

G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1774841) Visitor Counter : 171


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu