पोलाद मंत्रालय
खाण मंत्रालयाने एनएमडीसीला पंचतारांकित मानांकन दिले आहे
Posted On:
24 NOV 2021 7:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2021
खाणी आणि खनिजांवरील 5 व्या राष्ट्रीय परिषदेत राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ लिमिटेड (NMDC) या पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सार्वजनिक उपक्रमाला त्याच्या सर्व कार्यरत खाणींसाठी तीन वर्षांसाठी एकूण नऊ पंचतारांकित मानांकने प्राप्त झाली आहेत. यात कुमारस्वामी, बाचेली डिपॉझिट-5, डिपॉझिट 14 NMZ आणि डिपॉझिट नंबर 10 यांचा समावेश आहे. केंद्रीय संसदीय कामकाज, कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कंपनीच्या शाश्वत खाण प्रयत्नांसाठी एनएमडीसीचे संचालक (उत्पादन)दिलीप कुमार मोहंती यांचा सत्कार केला.
केंद्रीय संसदीय कामकाज , कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी खाणी आणि खनिजांवरील 5 व्या राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद भूषवले आणि राज्य सरकारांना 52 हून अधिक खाण क्षेत्रांचे वाटप केले. मान्यता प्रक्रिया सुलभ करण्यासाठी त्यांनी एक ई-पोर्टल देखील सुरू केले. खाण मंत्रालयाने 2017-18, 2018-19, 2019-20 या वर्षांसाठी शाश्वत आणि जबाबदार खाणकाम करणार्या खाणींना पंचतारांकित मानांकन प्रदान केले.
एनएमडीसीच्या वतीने पुरस्कार स्वीकारताना, संचालक (उत्पादन) दिलीप कुमार मोहंती म्हणाले, “भारतीय खाण उद्योगातील प्रमुख हितधारक म्हणून, ऊर्जा कार्यक्षम आणि टिकाऊ उत्पादन प्रक्रिया राबवणे ही आमची जबाबदारी आहे. पंचतारांकित मानांकन हे पर्यावरण संवर्धनाप्रति आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.”
पुरस्काराबद्दल टीमचे अभिनंदन करताना, एनएमडीसीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुमित देव म्हणाले, “गेल्या काही वर्षांमध्ये आमची खाण संकुले डिजिटलायझेशनकडे वळली आहेत. आहे.एनएमडीसीने खाणकामाच्या सुरक्षित, वैज्ञानिक आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब केला आहे ज्यांचा पर्यावरणावर कमीत कमी परिणाम होतो. आम्ही विविध पर्यावरण आणि ऊर्जा संवर्धन उपक्रमांवर काम करत आहोत.”
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1774775)
Visitor Counter : 190