आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 118.44 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


गेल्या 24 तासात 76.58 लाख लसीच्या मात्रा देण्यात आल्या.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.33%

गेल्या 24 तासात 9,283 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,11,481

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.93%) गेले 61 दिवस 2% पेक्षा कमी

Posted On: 24 NOV 2021 9:25AM by PIB Mumbai

देशभरात गेल्या 24 तासात  76,58,203 कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मात्रा देण्यात आल्याने, आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताने 118.44 (1,18,44,23,573) कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे.

1,22,71,257 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

HCWs

1st Dose

1,03,82,725

2nd Dose

94,26,512

 

FLWs

1st Dose

1,83,76,833

2nd Dose

1,63,60,597

 

Age Group 18-44 years

1st Dose

44,66,37,552

2nd Dose

19,89,48,841

 

Age Group 45-59 years

1st Dose

18,17,64,052

2nd Dose

11,33,02,934

 

Over 60 years

1st Dose

11,38,31,778

2nd Dose

7,53,91,749

Total

1,18,44,23,573

 

 

गेल्या 24 तासात 10,949 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत(महामारीच्या आरंभापासून)कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 3,39,57,698  इतकी झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.33% झाला आहे.

 

केंद्र आणि राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 150दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होण्याचा  कल कायम राहिला आहे.

गेल्या 24 तासात 9,283 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.


देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 1,11,481 आहे, देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.32% आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.

गेल्या 24 तासामध्ये एकूण 11,57,697 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 63.47 (63,47,74,225) कोटींहून अधिक चाचण्या घेतल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.93% असून गेल्या 61 दिवसांपासून हा दर 2% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.80% असून गेले 51 दिवस हा दर 2% पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 86 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे.

****

 Jaydevi PS/Sampada/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1774485) Visitor Counter : 144