माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 3

‘राजा राम तिवारी- भूले भटके वालों के बाबा’ यात्रेमध्ये हरवलेल्या प्रियजनांची पुनर्भेट घडविण्यासाठी मदत करणा-यांच्या मानवतेचे दर्शन देणारा चित्रपट 52व्या इफ्फीमध्ये प्रदर्शित


"गंगापुत्र"ची निर्मिती- निःस्वार्थी माणसाचा प्रवास दाखवणे ही, माझ्या आयुष्यात सर्वात निःस्वार्थीपणे केलेली निर्मिती: 52व्या इफ्फीमध्ये भारतीय पॅनोरमामध्ये चित्रपट दिग्दर्शक जय प्रकाश यांचे मनोगत

पणजी, 23 नोव्‍हेंबर 2021 

 

‘‘गंगापुत्र ची निर्मिती -  यात एका निःस्वार्थी माणसाचा प्रवास दाखवला आहे.  माझ्या आयुष्यात सर्वात निःस्वार्थीपणे केलेली ही निर्मिती आहे. अशा शब्दात दिग्दर्शक जय प्रकाश यांनी या माहितीपटाविषयी माहिती देताना सांगितले. राजा राम तिवारी या निःस्वार्थी सामाजिक कार्यकर्त्याच्या जीवनावर तयार केलेला हा माहितीपट आहे. त्याच्या या अव्दितीय कामाचे हे एक प्रकारे दस्तावेजीकरण आहे. हरवलेल्या लोकांना त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचवून, त्यांची भेट घालून देण्याचे काम राजा राम तिवारी करतात. 20 ते 28 नोव्हेंबर 2021 या काळामध्ये गोव्यात सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 52 व्या आवृत्तीमध्ये तिवारी यांच्यावर तयार करण्यात आलेल्या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. त्यानिमित्त चित्रपटाचे दिग्दर्शक जय प्रकाश यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय पॅनोरमाच्या नॉन फीचर फिल्म विभागामध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले.

राजा राम तिवारी नेमके होते तरी कोण? ते हरवलेल्या, एकमेकांपासून दूरावलेल्या प्रियजनांना एकत्र कसे आणतात? अगदी साधे धोतर आणि सदरा  असा वेश परिधान करणारे राजा राम तिवारी यांना ‘भूले भटकवालों का बाबा’ (हरवलेल्यांचा तारणहार म्हणून)या नावाने ओळखले जाते. महाप्रचंड गर्दी असलेल्या कुंभमेळ्यामध्ये हरविणा-या यात्रेकरूंना पुन्हा एकदा त्यांच्या प्रियजनांना भेटविण्यासाठी राजा राम तिवारी यांनी ‘खोया पाया’ शिबीर-तंबू तयार करतात. केवळ कुंभमेळ्यातच नाही तर त्यांनी आपले हेच जीवितकार्य आहे, असे मानून   जणू ही मोहीमच हाती घेतली आहे. यासाठी 1946 मध्ये त्यांनी ‘खोया-पाय शिबीर’ या प्रतिष्ठानची स्थापना केली. या संस्थेमार्फत आत्तापर्यंत जवळपास 15 लाख महिला आणि पुरूष तसेच 21,000 पेक्षाही जास्त हरवलेल्या बालकांना, त्यांचे पालक शोधून त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले आहे. 4,700 एकर क्षेत्रामध्ये भरलेल्या मेळ्यामध्ये 41 दिवसांपेक्षा कमी कालावधीत हरवलेल्या बालकांच्या पालकांना शोधून, त्यांना मुलांचा ताबा देण्यात राजा राम तिवारी यांच्या प्रतिष्ठानला यश मिळाले आहे.

तिवारींचा वारसा अजूनही कायम आहे; 2016 मध्ये त्यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन होऊनही , हे शिबिर कुंभमेळा, अर्ध कुंभमेळा आणि माघ मेळ्यातील भाविकांसाठी मार्गदर्शक दिवा  आहे, अतुलनीय उत्साहाने आणि समर्पणाने ते गरजूंची सेवा करत आहेत.

 

चित्रपटाच्या जन्माबाबत  बोलताना, दिग्दर्शक म्हणाले की या चित्रपटातून  70 वर्षांहून अधिक काळ टिकलेला  राजा राम तिवारी यांचा अनोखा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न रुपेरी पडद्यावर दाखवला आहे.

त्यांच्या टीमने सामाजिक कार्यकर्त्यांच्या योगदानाची व्याप्ती आणि भव्यता  प्रेक्षक  अनुभवू शकतील यासाठी  विशेष प्रयत्न कसे केले याची सविस्तर माहिती प्रकाश यांनी चित्रपट रसिकांना दिली. तिवारींनी स्थापन केलेल्या ‘खोया पाया’ शिबिरांना प्रशासन आणि पोलिसांकडून मदत मिळते.

प्रकाश यांनी तिवारी यांच्या अविरत  चाललेल्या मानवतावादी प्रयत्नांना अधिकृत ओळख  मिळावी यासाठी उत्कट आवाहन केले. त्यांना  आशा आहे की देशभरातील प्रेक्षकांना या माहितीपटाद्वारे राजा राम तिवारी यांचे निस्वार्थ कार्य पाहायला मिळेल आणि त्यांच्या कार्याची दखल  घेतली जाईल.

 

* * *

Jaydevi PS/S.Bedekar/S.Kane/D.Rane

iffi reel

(Release ID: 1774324) Visitor Counter : 242


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi