उपराष्ट्रपती कार्यालय

कोविड-19 काळात प्रयत्नात कल्पकता आणून कामगिरी उंचावल्याबद्दल उपराष्ट्रपतींकडून रेल्वेची प्रशंसा


महामारीशी लढा देण्याकरिता मदत करण्याबरोबरच गरजेच्या काळात अत्यावश्यक जीवनवाहिनी असल्याचे रेल्वेने केले सिध्द

Posted On: 22 NOV 2021 4:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2021

 

कोविड-19 ने निर्माण केलेल्या अभूतपूर्व आव्हानातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नात कल्पकता आणून कामगिरी उंचावल्याबद्दल आणि रेल्वेची चाके फिरती ठेवून ग्राहकांचे संरक्षण केल्याबद्दल उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी  भारतीय रेल्वेची प्रशंसा केली आहे.

कोविड सुश्रुषा विलगीकरण रेल्वे डबे, श्रमिक विशेष गाड्या, ऑक्सिजन एक्स्प्रेस यासारखी उदाहरणे देत भारतीय रेल्वेने आपली संपूर्ण यंत्रणा सज्ज करत महामारीशी प्रभावी मुकाबला करण्यासाठी देशाला सहाय्य केल्याचे उपराष्टपती म्हणाले.

पीपीई कीट, सॅनिटायझर आणि मास्क यांची स्वतः निर्मिती केल्याबद्दल आणि वैद्यकीय साहित्य आणि मालाचा शहरे  आणि गावांना पुरवठा सुनिश्चित केल्याबद्दल त्यांनी रेल्वेची प्रशंसा केली. या तत्पर पावलांमुळे वस्तू आणि अन्नधान्यांचा तुटवडा कमी राखला. यामुळे महामारीशी लढा देण्याकरिता मदत करण्याबरोबरच गरजेच्या काळात  अत्यावश्यक जीवनवाहिनी असल्याचे रेल्वेने सिध्द  केल्याचे ते म्हणाले.

विशाखापट्टणम- किरांडूल प्रवासी गाडीला सुधारित एलएचबी डबा आणि अतिरिक्त विस्टाडोमडब्याला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ते आज विशाखापट्टणम रेल्वे स्थानकावर बोलत होते.

स्वच्छतेसाठी विशाखापट्टणमची प्रशंसा करत स्वच्छ भारत अभियानाची लोक चळवळ म्हणून अशीच गती कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. रेल्वे आणि रेल्वे स्थानके स्वच्छ ठेवण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.    

 

S.Tupe/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1774058) Visitor Counter : 143