माहिती आणि प्रसारण मंत्रालय
ते मूळ रहिवासी आहेत, म्हणून ते आहेत तसे आहेत: एमी बरुआ, दिमासा भाषेतील पहिल्या इफ्फी भारतीय पॅनोरामा चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि अभिनेत्री
या जगातील तरीही त्यापेक्षा निराळे : सेमखोर, सुखसोयींपासून ‘अलिप्त’ राहू इच्छिणाऱ्या सामसा समुदायाची कथा
पणजी, 21 नोव्हेंबर 2021
“त्यांच्याकडे कोणत्याही भौतिक गरजा आणि सुखसोयी नाहीत आणि त्यांना त्या नको आहेत. ते स्वतः जसे आहेत त्यातच समाधानी आहेत. सेमखोरचे लोक - ते मूळ लोक आहेत, म्हणून ते आहेत तसे आहेत."
प्रख्यात आसामी अभिनेत्री एमी बरुआ दिग्दर्शित सेमखोर चित्रपटाची गोव्यात सुरु असलेल्या 52 व्या इफ्फीच्या इंडियन पॅनोरमा 2021 चा उदघाटन सिनेमा म्हणून निवड करण्यात आली आहे आणि हे शब्द होते दिग्दर्शिकेचे जिने सामसा समुदायाचे जीवन टिपण्याचा धाडसी प्रयत्न केला. रीतिरिवाज, विधी आणि प्राचीन समजुतींच्या आधारे बाहेरील जगापासून एकटे राहायला त्यांना आवडते. याबरोबरच ‘सेमखोर’ हा इफ्फीमध्ये असा सन्मान मिळवणारा दिमासा भाषेतील पहिला चित्रपट ठरला आहे.
अभिनेत्री -दिग्दर्शक-पटकथा लेखक, ज्या स्वतः यात मुख्य भूमिकेत आहेत, त्यांन काल गोवा येथे इफ्फीच्या निमित्ताने पत्रकार परिषदेला संबोधित केले.
हा चित्रपट सेमखोरच्या लोकांच्या चालीरीती, परंपरा आणि संकल्पनांचे प्रतिनिधित्व करतो ज्यांना बाहेरील जगापासून 'अलिप्त ' राहायचे आहे. हा दिमासा भाषेत बनवला आहे जी त्या समुदायाद्वारे बोलली जाणारी एक बोली आहे, ज्यांच्या नावावरून आसाम आणि नागालँडच्या काही भागांमध्ये तिचे दिमासा नाव पडले आहे.
वृत्तपत्राच्या एका कात्रणाने एमी यांना या चित्रपटाद्वारे कसे पदार्पण करायला लावले याबाबत एमी सांगतात , “एक दिवस जेवताना मी वृत्तपत्राचे एक कात्रण वाचत होते, तेव्हा सेमखोरवरील एका छोट्या बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. हे मला इतके भावले की मी त्या समुदायाबद्दल अधिक विचार करू लागले ” असे त्या म्हणाल्या.
बरुआ यांनी सांगितले की त्यांना त्यांच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींच्या म्हणण्याविरोधात कसे जावे लागले, ज्यांनी तिला साम्सा समुदायाशी संवाद साधण्याचा कोणताही विचार करू नको असे सांगितले. मात्र त्यांच्या दृढ इच्छाशक्तीने विजय मिळवला.त्यावेळी मला समजले की हा प्रवास माझ्या कल्पनेपेक्षा खडतर असेल कारण ते बाहेरच्या लोकांशी एक शब्दही बोलणार नाहीत.”
सेमखोरच्या जगातल्या आपल्या वास्तव्याबद्दल काही मनोरंजक किस्से सामायिक करताना, एमी म्हणाल्या की त्यांना दिमासा या भाषेबद्दल काहीच माहिती नव्हती आणि पहिली पायरी म्हणून त्यांनी ती भाषा एका शिक्षकाच्या मदतीने एक वर्षात शिकल्या.
कल्पनेच्या पलीकडील एक अनोळखी जग तिची वाट पाहत होते. “ते बाहेरच्या जगातील कोणतीही उपकरणे / साधने वापरत नाहीत. त्यांच्या जगण्याचे मुख्य साधन हे शेती आहे.
इतकंच नाही तर बरुआच्या म्हणण्यानुसार, त्यांना बाहेरच्या जगाशी काही देणंघेणं नको आहे आणि कोणालाही त्यांच्या हद्दीत येऊ द्यायचं नाही. याबाबत एमीकडे सामायिक करण्यासाठी एक स्पष्टीकरण आहे आणि तिच्या म्हणण्यानुसार त्यांनी तिला विचारले की त्यांच्याकडे काय कमी आहे, की त्यांनी बाहेरच्या जगात शोध घ्यावा. "आमच्याकडे इथे सर्व काही आहे आणि आम्ही आनंदी आहोत, फक्त आमच्यापासून दूर राहा," हे त्यांचे घोषवाक्य आहे, असे एमी म्हणाल्या .
65 लोकांचा समावेश असलेल्या चित्रपटाच्या चमुला त्या गावात राहण्याची परवानगी नव्हती त्यामुळे त्यांनी एका टेकडीजवळ तळ ठोकला. गावात पोहोचण्यासाठीत्यांना दररोज 45 मिनिटे चालत जावे लागत होते
‘आम्हाला आमच्यासारखे जगू द्या ’ असे म्हणणाऱ्या समुदायाविषयी असा चित्रपट बनवण्यामागील हेतूबद्दल विचारले असता, एमी म्हणाल्या की ते अनेक दशके जुन्या पद्धती आणि परंपरा असलेले आयुष्य जगत आहेत. आपल्या चित्रपटाद्वारे त्यांनी जगाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की असे लोक या जगात अस्तित्वात आहेत आणि शक्य असल्यास बाहेरील जगाकडून काही उपाययोजना करून तेथील मुलांना उत्तम आरोग्य सेवा आणि शिक्षण देण्याच्या दृष्टीने त्यांचे जीवन चांगले बनवण्याचा प्रयत्न केला जावा अशी एमी यांची धारणा आहे.
ईशान्य प्रदेशातील चित्रपटाला अशी संधी दिल्याबद्दल इफ्फीचे आभार मानताना एमी म्हणाल्या की, दिग्दर्शक म्हणून पदार्पण करताना ही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे.
टोरोंटो आंतरराष्ट्रीय महिला चित्रपट महोत्सवात उत्तम कथानकासाठी आणि रंजक छायाचित्रणासाठी या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आधीच मोठे यश मिळवले आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता एमी बरुआ यांनी 25 आसामी चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1773899)
Visitor Counter : 263