महिला आणि बालविकास मंत्रालय
गेली 75 वर्ष हक्कांची तर पुढली 75 वर्ष जबाबदारीची : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी
Posted On:
21 NOV 2021 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2021
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी एक व्टीट करून#childrenofnewindia संदेश दिला आहे.
"देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षांची गौरवशाली वाटचाल साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत ''स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साजरा करत आहे. आगेकूच करताना , आगामी 75 वर्षात सर्व क्षेत्रात आघाडी घेणाऱ्या नव्या भारताचे, बलशाली भारताचे स्वप्न पाहूया. येत्या 75 वर्षांत आजच्या मुलांचे आणि उद्याच्या नागरिकांचे योगदानही मोलाची भूमिका बजावेल; चला मुलांना #ChildrenOfNewIndia त्यांच्या राष्ट्रासाठी प्रतिज्ञा घेण्यास प्रोत्साहित करूया.
चला, पुढल्या 75 वर्षांसाठीच्या कामाला सुरुवात करूया. देशसेवेशी आपले ध्येय जोडूया आणि करोडो भारतीयांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवूया."
G.Chippalkatti/S.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1773753)
Visitor Counter : 197