इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद येथे राजीव चंद्रशेखर आणि जनरल (डॉ) व्ही के सिंग (निवृत्त) यांच्या हस्ते आधार सेवा केंद्राचे उद्घाटन
Posted On:
21 NOV 2021 5:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2021
कौशल्य विकास आणि उद्योजकता तसेच इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर आणि रस्ते वाहतूक व महामार्ग आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त) डॉ. व्ही. के सिंग, यांनी आज उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद येथे पाचव्या आधार सेवा केंद्राचे संयुक्तपणे उद्घाटन केले. या केंद्राकडे दररोज 1000 रहिवाशांकडून विनंती हाताळण्याची क्षमता आहे.
यावेळी राजीव चंद्रशेखर यांनी सर्वांचे अभिनंदन केले. ही सार्वजनिक सुविधा गाझियाबादच्या रहिवाशांना पूर्णपणे समर्पित असल्याचे त्यांनी सांगितले. वडील भारतीय हवाई दलात अधिकारी असल्याने विद्यार्थीदशेतली 2 वर्षे हिंडन विमानतळावर राहिलो असल्याचा उल्लेख करत या शहराशी असलेल्या आपल्या जुन्या संबंधांबद्दल त्यांनी सांगितले.
भारतासारख्या विकसनशील देशात तंत्रज्ञान साध्यतेसाठी 3 व्यापक परिणाम देणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाबाबतच्या दूरदृष्टीबद्दल त्यांनी सांगितले. हे तीन परिणाम म्हणजे-
- नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञान
- आर्थिक संधींचा विस्तार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर
आणि
- विशिष्ट तंत्रज्ञानामध्ये धोरणात्मक क्षमता निर्माण करणे
गेल्या 6 वर्षात डिजिटल इंडिया मोहिमेच्या यशावर त्यांनी प्रकाश टाकला. भारत सरकारकडून गरीब आणि गरजूंच्या कल्याणासाठी जारी करण्यात आलेले 100 टक्के पैसे आता एका बटणाच्या क्लिकवर त्यांच्या खात्यात पोहोचतात, हे त्यांनी अधोरेखित केले. 80 च्या दशकात एका माजी पंतप्रधानांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विधानाच्या नेमके उलट आता घडत आहे. केंद्र सरकारने वितरित केलेल्या 100 टक्के पैशांपैकी केवळ 15 पैसे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात असे विधान माजी पंतप्रधानांनी केले होते.
G.Chippalkatti/S.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1773743)
Visitor Counter : 250