माहिती आणि प्रसारण मंत्रालय
52व्या इफ्फी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात हॉलिवुड चित्रपटनिर्माते मार्टिन स्कोर्सेजी यांचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान
आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्त्वाचा इफ्फीकडून गौरव
पणजी, 20 नोव्हेंबर 2021
जागतिक चित्रपटसृष्टीमध्ये केलेल्या महान कार्याचा गौरव करण्यासाठी हॉलिवुडचे चित्रपटनिर्माते मार्टिन स्कोर्सेजी यांना आज 20 नोव्हेंबर 2021 रोजी गोवा येथे 52व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात व्हर्चुअल माध्यमातून सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारत असताना आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीमधील या दिग्गज व्यक्तिमत्त्वाने एका व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “खऱ्या अर्थाने अतिशय महान चित्रपटनिर्मात्यांपैकी एक असलेल्या आणि आपले प्रेरणास्थान असलेल्या सत्यजित रे यांच्या नावाने हा पुरस्कार मिळणे म्हणजे माझा मोठा बहुमान आहे. ज्या ज्या वेळी मी त्यांचे चित्रपट पाहतो त्या त्या वेळी मी पुन्हा पुन्हा त्यांच्या कामामुळे प्रेरित होतो. पाथेर पांचाली पाहणे माझ्यासाठी एक अविस्मरणीय अनुभव होता आणि त्याने माझ्यासमोर एक संपूर्ण नवे विश्व उभे केले.”
रे यांच्या चित्रपटात कशा प्रकारे उत्कट भावना, लगबग, हळुवारपणा आणि संवेदनशीलता महत्त्वाच्या भूमिका बजावत असायच्या याविषयी उजाळा देताना स्कोर्सेजी यांनी सांगितले की त्यांचे स्वतःचे चित्रपट तयार करताना त्यांना रे यांच्या चित्रपटातील संगीतामधून प्रेरणा मिळाली. “ मी माझ्या मुलीला ती लहान असताना पाथेर पांचाली दाखवला आणि त्यामुळे जगाला स्वीकारण्याबाबतच्या आणि जगभरात आपल्या आजुबाजूला असलेल्या संस्कृतींना समजून घेण्याबाबतच्या तिच्या दृष्टीकोनावर खूप मोठा प्रभाव निर्माण झाला.”
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करत या चित्रपट निर्मात्याने हा पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल भारतीय चित्रपट उद्योगाचे आभार मानले.
21 व्या शतकातील चित्रपटांची सर्वोत्तम जाण असलेल्यांपैकी एक हॉलीवूड चित्रपट निर्माते मार्टिन स्कॉरसेसी यांनी गुडफेलाज, टॅक्सी ड्रायव्हर, रेजिंग बुल, द डीपारटेड, शटर आयलंड, द वर्ल्ड ऑफ द वॉल स्ट्रीट या सारखे मास्टरपीस चित्रपट तयार केले आहेत.
* * *
Jaydevi PS/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1773542)
Visitor Counter : 274