माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सीआयआय बिग पिक्चर शिखर परिषदेच्या समारोप सत्रात माहिती आणि प्रसारण सचिवांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे
Posted On:
18 NOV 2021 8:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2021
- माध्यमे आणि करमणूक क्षेत्राचा विकास साधारणपणे अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक वेगाने व्हायला हवा कारण माध्यमे आणि करमणूक क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे एक आघाडीचे क्षेत्र आहे आणि ते अर्थव्यवस्थेवर अवलंबून नाही.
- माध्यमे आणि करमणूक क्षेत्राने 100 अब्ज डॉलर्स मूल्याची बाजारपेठ बनण्याचे लक्ष्य ठेवले पाहिजे. या क्षेत्राला उज्ज्वल भविष्य आहे.
- जोपर्यंत आशय सामग्री कायद्याच्या कक्षेत आहे, तोपर्यंत सरकार कोणत्याही आशय सामग्रीचे समर्थन करण्यास तयार आहे आणि त्यावर कोणतीही मर्यादा असू नये . या वचनबद्धतेचे पालन करण्याचा मंत्रालय प्रयत्न करत आहे.
- सरकारचा सहभाग मर्यादित ठेवत आहे .
- चित्रपटगृहे उभारण्याबाबतचे कायदे खूप जुने आहेत आणि छायाचित्रण कायद्याच्या वेळी तयार केले होते. सरकार राज्यांना या प्राचीन कायद्यांबाबत पुनर्विचार करण्यास सांगेल.
- पायरसी विरोधी चळवळीला सरकारचा पाठिंबा आहे. पायरसी हे एक संकट असून त्यासाठी सर्व स्तरांवर कठोर कारवाईची आवश्यकता आहे. छायाचित्रण कायद्याच्या मसुद्यात पायरसीत सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. सरकार आता सीआयआय सोबत डिजिटल माध्यमातील पायरसीवरील त्यांच्या प्रस्तावांवर काम करण्यास इच्छुक आहे.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1773065)
Visitor Counter : 176