उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींनी गुरु नानक जयंतींच्या पूर्वेसंध्येला देशाला दिल्या शुभेच्छा

Posted On: 18 NOV 2021 6:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर 2021

उपराष्ट्रपती श्री व्यंकय्या नायडू यांनी गुरु नानक जयंतींच्या पूर्वेसंध्येला आज देशाला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी म्हटले आहे -

मी गुरू नानक देवजींच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो.

शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देवजी हे आपल्या सदाचारी जीवनाच्या माध्यमातून सत्य, करुणा आणि धार्मिकतेचे प्रतीक होते.  त्यांची दिव्य शिकवण आपल्याला धार्मिकतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देत राहील आणि जात, संप्रदाय किंवा धर्माची पर्वा न करता सर्व मानवांचा आदर करण्यासाठी प्रेरीत करत राहील.

गुरू नानक देवजी यांनी आपल्याला नैतिकतेच्या मार्गावर चालायला शिकवले.  सामान्य माणसाला अध्यात्माशी जोडून खर्‍या अर्थाने धर्माला जनतेपर्यंत पोहोचवणारे ते भारतातील उदात्त अध्यात्मिक विचारांचे प्रसिद्ध प्रचारक होते.

न्याय, करुणा आणि समरसतेने परिपूर्ण समाज निर्माण करण्यासाठी त्यांचा शाश्वत संदेश आम्हाला मार्गदर्शन करत राहो अशी कामना मी व्यक्त करतो.

 

 S.Patil/V.Ghode/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1773014) Visitor Counter : 184