भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक व्यवस्थापनावर पाच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण मॉड्युल्स प्रकाशित केली

Posted On: 17 NOV 2021 10:28PM by PIB Mumbai

 

भारतीय  निवडणूक आयोगाने  निवडणुकीसाठी नियोजन, राजकीय वित्तपुरवठा , मतदार नोंदणी, निवडणूक तंत्रज्ञान, आणि राजकीय पक्ष आणि ईएमबी संबंधी पाच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण मॉड्यूल प्रकशित केली.  इंटरनॅशनल फाऊंडेशन फॉर इलेक्टोरल सिस्टीम (IFES) च्या सहकार्याने इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM)  तयार करत असलेल्या  एकूण दहा मॉड्यूलचा हा भाग आहे. मुख्य निवडणूक आयुक्त  सुशील चंद्रा आणि निवडणूक आयुक्त  राजीव कुमार आणि  अनुप चंद्र पांडे, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वॉशिंग्टनहून सहभागी झालेले आयएफईएसचे अध्यक्ष अँथनी बॅनबरी आणि   त्यांच्या टीमने या मॉड्युल्सचे व्हर्चुअल प्रकाशन केले.

द इंटरनॅशनल फाउंडेशन फॉर इलेक्टोरल सिस्टीम (IFES) ही वॉशिंग्टन डीसी स्थित बिगर -सरकारी संस्था आहे जी नागरिकांच्या मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांमध्ये सहभागी होण्याच्या अधिकाराचे समर्थन करते. भारतीय निवडणूक आयोगाने  सुरुवातीला मे 2012 मध्ये आयएफईएस सोबत प्रशिक्षण मॉड्युल्सचा विकास  आणि क्षमता निर्मितीसाठी सामंजस्य करार केला होता. अलीकडेच 2019 मध्ये, तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वॉशिंग्टन भेटीनंतर, आयएफईएसने विद्यमान आठ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण मॉड्यूल्स अद्ययावत करण्यास आणि पॉलिटिकल पार्टीज अँड ईएमबी  आणि सोशल मीडिया अँड इलेक्शन्स  या दोन नवीन मॉड्यूल्सची निर्मिती करण्यास सहमती दर्शवली. यासाठी 5 ऑगस्ट 2020 रोजी करार करण्यात आला.

आयआयआयडीएमचे महासंचालक आणि वरिष्ठ डीईसी धर्मेंद्र शर्मा यांनी सांगितले की  आयोगाने सप्टेंबर 2019 मध्ये भारताच्या तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्तांनी A-Webचे अध्यक्ष म्हणून दर्शवलेल्या वचनबद्धतेचा भाग म्हणून या मॉड्यूल्सच्या काही भागांचे स्पॅनिश, फ्रेंच आणि पोर्तुगीजमध्ये भाषांतर करण्यास मान्यता दिली आहे. विदेशी भाषा सहाय्यित मॉड्यूल्स" विकसित करण्याची विनंती  अनेक विकसनशील देशांनी केली होती.

***

S.Patil/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1772766) Visitor Counter : 165


Read this release in: English , Urdu , Hindi