गृह मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने कोविड-19 ची सुधारलेली परिस्थिती लक्षात घेऊन 17 नोव्हेंबर 2021 पासून श्री करतारपूर साहिब कॉरिडॉरमधील व्यवहार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे
मोदी सरकारच्या या निर्णयाचा शीख यात्रेकरूंना होणार मोठ्या प्रमाणात फायदा
Posted On:
16 NOV 2021 3:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने कोविड-19 ची सुधारलेली परिस्थिती लक्षात घेऊन 17 नोव्हेंबर 2021 पासून श्री करतारपूर साहिब कॉरिडॉरमधील व्यवहार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड-19 महामारीमुळे 16 मार्च 2020 पासून या कॉरिडॉरमधील सर्व व्यवहार स्थगित करण्यात आले होते. श्री करतारपूर साहिब हे कोट्यवधी भारतीयांचे श्रद्धास्थान आहे आणि मोदी सरकारचा श्री करतारपूर साहिब कॉरिडॉरमधील व्यवहार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय मोदी सरकारची शीख समुदायाविषयी असलेली संवेदनशीलता दर्शवत आहे.
मोदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा मोठ्या प्रमाणात शीख यात्रेकरूंना होणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री, अमित शहा यांनी कॉरिडॉरमधील व्यवहार लवकरात लवकर पुन्हा सुरू करण्यासाठी योग्य वेळी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठका घेतल्या.
श्री कर्तारपूर साहिब कॉरिडॉरमार्गे तीर्थयात्रा सध्याच्या प्रक्रियेनुसार आणि कोविड प्रतिबंधक नियमावलीच्या पालनानुसार सुरू केली जाईल.
भारताने 24 ऑक्टोबर 2019 रोजी डेरा बाबा नानक, आंतरराष्ट्रीय सीमेवरील झिरो पॉइंट येथे श्री करतारपूर साहिब कॉरिडॉर कार्यान्वित करण्याच्या प्रक्रियांसंदर्भात पाकिस्तानसोबत करार केला होता. या स्वाक्षरी कार्यक्रमाच्या वेळी परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालयाचे प्रतिनिधी आणि पंजाब सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्रिमंडळाने 22 नोव्हेंबर 2018 रोजी श्री गुरू नानक देवजींच्या 550 व्या जयंती दिनाचा ऐतिहासिक सोहळा देशभरात आणि जगभरात भव्य आणि सुयोग्य पद्धतीने साजरा करण्याचा ठराव मंजूर केला होता.
एका ऐतिहासिक निर्णयांतर्गत, केंद्रीय मंत्रिमंडळाने डेरा बाबा नानक ते आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंत श्री करतारपूर साहिब कॉरिडॉरची इमारत आणि विकासाला देखील मंजुरी दिली होती, ज्यामुळे भारतातील यात्रेकरूंना गुरुद्वारा दरबार साहिब करतारपूरला वर्षभर सहजतेने आणि विनासायास भेट देता येईल.
S.Tupe/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1772298)
Visitor Counter : 255