अर्थ मंत्रालय

आर्थिक वर्ष 2021-22: वाढती औद्योगिक प्रगती, महागाईवर नियंत्रण आणि भक्कम सेवा पुनरुज्जीवन

Posted On: 15 NOV 2021 10:41AM by PIB Mumbai

सप्टेंबर 2021,महिन्यासाठीचा औद्योगिक उत्पादनाच्या प्राथमिक अंदाजाची आकडेवारी जारी करण्यात आली असून, औद्योगिक उत्पादनात यावर्षी सातत्याने वाढ होत असल्याच आढळले आहे. आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा औद्योगिक उत्पादन निर्देशांकात, पहिल्या तिमाहीत सरासरीच्या 121.3  टक्के तर दुसऱ्या तिमाहीत सरासरीच्या 130.2  टक्के वाढ झाली. दुसऱ्या तिमाहीत, औद्योगिक उत्पादनात आणखी वाढ झाली असतो, मात्र, दीर्घकाळ चाललेल्या मोसमी पावसामुळे, खाणकाम, विशेषतः कोळसा उत्खनन कमी झाले, परिणामी वीजनिर्मितीवरही त्याचा परिणाम झाला. ज्यामुळे, एकूण उत्पादनाची वाढ मंदावली.

 

औद्योगिक उत्पादनातील उत्पादन क्षेत्राचा निर्देशांक स्थिर राहीला असून, येणाऱ्या महिन्यात या निर्देशांकात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, खरेदी व्यवस्थापन निर्देशाकांने आठ महिन्यांतली सर्वोच्च कामगिरी नोंदवली आहे. ऑक्टोबर महिन्यात उत्पादन क्षेत्र 55.9  वर पोहोचले होते.

 

भांडवली वस्तू निर्देशांकात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झालेली आढळली आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये पहिल्या तिमाहीत  यात सरासरीच्या तुलनेत, 74.0 इतकी वाढ झाली आहे; तर दुसऱ्या तिमाहीत, ही वाढ 91.7 टक्के इतकी असून, यामुळे गुंतवणुकीत वाढ झाल्याच स्पष्टपणे अधोरेखित होत आहे.

 

मागणी वाढल्यामुळे, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये गुंतवणूक वाढल्याचे स्पष्टपणे निदर्शनास आले आहे. कारण ग्राहकांच्या खरेदी क्षमतेची स्थिती सांगणाऱ्या निर्देशांकातही पहिल्या तिमाहीत 91.7  पासून, दुसऱ्या तिमाहीत 121.2 पर्यंत वाढ झाली आहे. तर ग्राहकोपयोगी टिकावू वस्तूंच्या किमतीवर आधारित निर्देशांकात, दोन तिमाहींमध्ये 139.1 वरुन 146.9 इतकी वाढ झाली आहे.

 

आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये ग्राहकांच्या किमतीवर आधारित निर्देशांक ऑक्टोबर महिन्यात,  स्थिरावलेला आहे. ग्राहकांच्या किमतीवर आधारित वार्षिक निर्देशांक पहिल्या तिमाहीत 5.6  टक्के होता, जो दुसऱ्या तिमाहीत 5.1 टक्क्यांपर्यंत पोहोचला आणि ऑक्टोबर महिन्यात तो आणखी कमी म्हणजे 4.5 टक्के इतका झाला आहे.

 

त्याचप्रमाणे, ग्राहकांच्या खाद्यपदार्थ क्षमतेच्या किरकोळ किमतीवरील निर्देशांक आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत, 4.0  टक्के होता, जो दुसऱ्या तिमाहीत, 2.6 टक्के झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यात या निर्देशांकात आणखी घट होऊन तो 0.8 टक्क्यांपर्यंत कमी झाला, मागणीच्या साखळीत असलेले अडथळे दूर होऊन, पुरवठ्याच्या प्रमाणात मागणी सुरळीत झाल्याचेच हे द्योतक आहे.

 

उच्च वारंवारिता निर्देशकात दिसत असल्याप्रमाणे, वर्ष 2021-22 मध्ये अनेक कामांना स्थिर गती मिळाली आहे. यात, ई-वे बिल्स, उर्जा क्षमता आणि वस्तू आणि सेवा कर संकलन यांचा समावेश आहे. वस्तू आणि सेवा करात, या आर्थिक वर्षात, लक्षणीय वाढ झाली असून, ऑक्टोबर महिन्यात हे संकलन 1.3 लाख कोटी रुपये इतके झाले आहे, ज्यातून अर्थव्यवस्थेत वृद्धी होत असल्याचे निदर्शनाला येत आहे. या वर्षात, ऑक्टोबर महिन्यात, ट्रॅक्टरची विक्रमी विक्री, होऊन  1,15,615 ट्रॅक्टर्स विकले गेले आहेत, सप्टेंबरच्या तुलनेत या विक्रीत 25 % ची वाढ झाली आहे. यातून कृषी क्षेत्रात शाश्वत आणि स्थिर वाढ होत असल्याचेच प्रतिबिंबित होत आहे.

 

पीएमआय सेवांमध्ये देखील वाढ झाली असून, ऑक्टोबर महिन्यात ही सेवा  58.4  या गेल्या दशकभरातील उच्चांकावर पोहोचली आहे. कोविड महामारीचा जोर ओसरल्यानंतर संपर्क आधारित सेवांक्षेत्रात वाढ झाल्याचे हे निदर्शक आहे. आरामदायी पर्यटनस्थळांवरील सरासरी हॉटेलच्या बुकिंगमध्ये, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, 55 टक्के वाढ झाली तर दुसऱ्या तिमाहीत 60 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. 

 

भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचे इंजिन म्हणून, निर्यात क्षेत्राने मोठी मजल मारली आहे. चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबर महिन्यात, सलग सातव्या महिन्यात, निर्यातीने 30 अब्ज डॉलर्सचा आकडा पार केला आहे. सम्रग दृष्टीने पाहता, भारताची व्यापारी निर्यात एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यात 232.58 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली. 2019 साली याच कालावधीतल्या निर्यातीपेक्षा हे प्रमाण 54.5%  अधिक आहे.

शेड्युल्ड व्यावसायिक बँकांच्या पत थकबाकीत चालू आर्थिक वर्षात, सातत्याने वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेषतः किरकोळ पत थकबाकी वाढली असून, अर्थव्यवस्थेत खरेदी क्षमता अधिक वाढली असल्याचे ते निदर्शक आहे. सिबिल (CIBIL) च्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी ते ऑक्टोबर महिन्यात, पतविषयक चौकशीत 54 टक्के वाढ झाली आहे, कारण या काळात आर्थिक घडामोडींमध्ये लक्षणीय वाढ झाली.

****

Jaydevi PS/ Radhika A/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1771902) Visitor Counter : 211