राष्ट्रीय वित्तीय परीक्षण प्राधिकरण
सूक्ष्म, लघु आणि मध्यम कंपन्यांसाठी वैधानिक लेखापरीक्षण आणि लेखा परीक्षण मानकाविषयी सल्लापत्र - टिपण्णी नोंदवण्यासाठी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ
Posted On:
09 NOV 2021 9:49PM by PIB Mumbai
सूक्ष्म, लघु आणि मध्यम कंपन्यांसाठी वैधानिक लेखापरीक्षण आणि लेखा परीक्षण मानकाविषयी सल्लापत्र - टिपण्णी नोंदवण्यासाठी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी ही मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत होती. हे सल्लापत्र पुढील लिंकवर बघता येईल-: https://nfra.gov.in/sites/default/files/NFRAConsultationPaperMSMCs_0.pdf
आपले अभिप्राय नोंदवण्यासाठी comments-tac.paper@nfra.gov.in येथे इ-मेल पाठवू शकता
किंवा टपालाने NFRA अर्थात राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरणाला पुढील पत्त्यावर पाठवू शकता-:
सचिव,
NFRA -राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरण,
7वा-8वा मजला, हिंदुस्थान टाइम्स हाऊस,
18-20 कस्तुरबा गांधी मार्ग, नवी दिल्ली 110001.
NFRA अर्थात राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरणाविषयी-:
भारतात हिशेब आणि लेखा परीक्षण यासाठी ऑक्टोबर 2018 मध्ये स्वतंत्र नियामक म्हणून राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरण, याची स्थापना करण्यात आली. हे अधिकरण वस्तुनिष्ठता, निष्ठा, निष्पक्षपातीपणा, स्वातंत्र्य, न्यायोचित व्यवहार आणि पारदर्शकता यासाठी ओळखले जावे, अशी अपेक्षा एन.एफ.आर.ए.च्या सनदीत व्यक्त करण्यात आली आहे. कोणत्याही शिफारशी करताना, व्यवसाय-सुलभतेवरील संभाव्य परिणामांचा एन.एफ.आर.ए.विचार करते. कंपनी कायदा, 2013 च्या कलम 132(2)(क) [म्हणजे 132(2)(a)] नुसार, हिशेब तपासणी आणि लेखा परीक्षण यासाठीचे धोरण आखण्यासाठी तसेच कंपन्या किंवा कंपन्यांचे विशिष्ट वर्ग किंवा त्यांचे लेखा-परीक्षक यांच्या प्रमाणकांविषयीही एन.एफ.आर.ए.ने केंद्र सरकारला शिफारशी देणे आवश्यक आहे.
***
N.Chitale/J.Waishampayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1770401)
Visitor Counter : 207