राष्ट्रपती कार्यालय
छठपूजेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून जनतेला शुभेच्छा
Posted On:
09 NOV 2021 5:41PM by PIB Mumbai
छठपूजेच्या पूर्वसंध्येला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या शुभेच्छा-संदेशात राष्ट्रपती म्हणतात, "भारतात आणि भारताबाहेर राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना, छठपूजेचे औचित्य साधून मी मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे. त्यांच्यासाठी सदिच्छा व्यक्त करत आहे.
छठपूजा हा देशातील सर्वात प्राचीन उत्सवांपैकी एक आहे. यामध्ये मावळत्या सूर्याला अर्घ्य अर्पण केले जात असल्याने हा उत्सव महत्त्वाचा ठरतो. दिवसभर कडक उपवास केल्यानंतर उत्सवाच्या अंती भाविक, नद्या आणि सरोवरांमध्ये पवित्र स्नान करतात. हा उत्सव म्हणजे, सूर्यदेवाशी आणि निसर्गाशी असणाऱ्या आपल्या नात्याची विलक्षण अभिव्यक्तीच म्हटली पाहिजे.
निसर्गाशी असणारे आपले चिरंतन नाते या उत्सवानिमित्ताने आणखी बळकट होवो आणि आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी त्याची मदत होवो, ही प्रार्थना."
राष्ट्रपतींचा शुभेच्छासंदेश हिंदीमध्ये वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
***
N.Chitale/J.Waishampayan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1770324)
Visitor Counter : 236