भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

विद्यमान सदस्य 01.01.2022 रोजी निवृत्त होत असल्याने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 06 जागांसाठी 05 स्थानिक शासन संस्था मतदारसंघातून द्वैवार्षिक निवडणूक

Posted On: 09 NOV 2021 3:20PM by PIB Mumbai

 

खाली दिलेल्या तपशिलानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या 07 स्थानिक शासन संस्थांच्या मतदारसंघातील 08 विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ 01.01.2022 रोजी समाप्त होत आहे:

महाराष्ट्र

अ.क्र.

स्थानिक स्थानिक शासन संस्थांच्या मतदारसंघाचे नाव

जागांची संख्या

निवृत्त होणाऱ्या सदस्याचे नाव

सेवानिवृत्तीची तारीख

1.

मुंबई

02

कदम रामदास गंगाराम

01.01.2022

अशोक अर्जुनराव उर्फ ​​भाई जगताप

2.

कोल्हापूर

01

पाटील सतेज उर्फ ​​बंटी डी.

01.01.2022

3.

धुळे-सह-नंदुरबार

01

अमरीशभाई रसिकलाल पटेल

01.01.2022

4.

अकोला-सह-बुलढाणा-सह-वाशीम

01

गोपीकिसन राधाकिसन बाजोरिया

01.01.2022

5.

नागपूर

01

व्यास गिरीशचंद्र बच्छराज

01.01.2022

6.

सोलापूर

01

प्रशांत प्रभाकर परिचारक

01.01.2022

7.

अहमदनगर

01

अरुणकाका बलभीमराव जगताप

01.01.2022

 

2. स्थानिक शासन संस्थांच्या मतदारसंघाच्या निवडणुकीच्या संदर्भात, निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत त्यानुसार जर एखाद्या स्थानिक शासन संस्थेच्या मतदारसंघातील किमान 75% स्थानिक अधिकारी कार्यरत असतील आणि त्याव्यतिरिक्त मतदारसंघातील एकूण मतदारांपैकी किमान 75% मतदार उपलब्ध आहेत, अशावेळी त्या मतदारांना विधानपरिषदेवर प्रतिनिधी निवडण्यासाठी उपलब्ध मानले जाते. निवडणूक आयोगाच्या या मार्गदर्शक तत्त्वांना भारतीय निवडणूक आयोग विरुद्ध शिवाजी आणि ओआरएस  (एआयआर 1988 एससी 61) मध्ये सर्वोच्च न्यायालयाची मान्यता मिळाली.

3. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र शासन पत्र दि 25.10.2021 प्रमाणे अस्तित्वातील स्थानिक संस्थेत 7 पैकी 5 स्थानिक प्राधिकरणे 75% पेक्षा अधिक कार्यरत आहेत. (सोलापूर आणि अहमदनगर स्थानिक संस्था मतदारसंघ वगळता').

4. आता, आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी 06 जागांसाठी खालील 05 स्थानिक शासन संस्था मतदारसंघातून द्वैवार्षिक निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे:-

अ.क्र.

स्थानिक शासन संस्थांच्या मतदारसंघाचे नाव

जागांची संख्या

निवृत्त होणाऱ्या सदस्याचे नाव

1.

मुंबई

02

कदम रामदास गंगाराम

अशोक अर्जुनराव उर्फ ​​भाई जगताप

2.

कोल्हापूर

01

पाटील सतेज उर्फ ​​बंटी डी.

3.

धुळे-सह-नंदुरबार

01

अमरीशभाई रसिकलाल पटेल

4.

अकोला-सह-बुलढाणा-सह-वाशीम

01

गोपीकिसन राधाकिसन बाजोरिया

5.

नागपूर

01

व्यास गिरीशचंद्र बच्छराज

 

5. वर नमूद केलेल्या 05 स्थानिक शासन संस्थांच्या मतदारसंघांसाठीचा निवडणूक कार्यक्रम खालीलप्रमाणे असेल:-

अ.क्र.

अ.क्र.

दिनांक

 

अधिसूचना जारी करणे

16 नोव्हेंबर, 2021 (मंगळवार)

 

नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख

23 नोव्हेंबर, 2021 (मंगळवार)

 

नामनिर्देशनपत्रांची छाननी

24 नोव्हेंबर, 2021 (बुधवार)

 

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख

26 नोव्हेंबर, 2021 (शुक्रवार)

 

मतदानाची तारीख

10 डिसेंबर, 2021 (शुक्रवार)

 

मतदानाचा कालावधी

सकाळी 08:00 ते दुपारी 04:00 पर्यंत

 

मतमोजणी

14 डिसेंबर, 2021 (मंगळवार)

 

निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल

16 डिसेंबर, 2021 (गुरूवार)

 

 

 

 

 

 

 

6. भारतीय निवडणूक आयोगाद्वारे आधीच जारी केलेली कोविड-19 ची व्यापक मार्गदर्शक तत्त्वे तसेच भारतीय निवडणूक आयोगाने नुकतीच जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे 28.09.2021 च्या प्रसिद्धी पत्र्याच्या परिशिष्ट 06 मध्ये समाविष्ट आहेत https://eci.gov.in/candidate-political-parties/instructions-on-covid-19/  या लिंकवर ते उपलब्ध आहेत. या सूचनांचे निवडणूक प्रक्रियेदरम्यान सर्व संबंधितांनी जेथे लागू असेल तेथे पालन करावे.

7. या निवडणुकीबाबतची आदर्श आचारसंहिता संबंधित मतदारसंघात तत्काळ प्रभावाने लागू होईल. कृपया आयोगाच्या पुढे दिलेल्या संकेतस्थळावर ती पाहावी :  https://eci.gov.in/files/file/4070-biennial-bye-elections-to-the-legislative-councils-from-council-constituencies-by-graduates%E2%80%99-and teachers%E2%80%99-and-local-authorities%E2%80%99-constituencies-%E2%80%93-mcc-instructions-%E2%80%93-regarding/

8. मुख्य सचिव, महाराष्ट्र यांना निवडणूकीचे नियोजन करताना कोविड-19 प्रतिबंधात्मक उपायांबाबतच्या सध्याच्या सूचनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्यासाठी राज्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

***

S.Tupe/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1770275)
Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu