सांस्कृतिक मंत्रालय
केदारनाथ इथे पंतप्रधानांच्या हस्ते शिलान्यास आणि विविध विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित
पंतप्रधानांच्या हस्ते श्री आदि शंकराचार्य समाधीचे उद्घाटन आणि श्री आदि शंकराचार्यांच्या पुतळ्याचे अनावरण
आदि शंकराचार्यांनी दिलेली अद्वैताची प्रमुख शिकवण सर्वसमावेशकता, समानता, ज्ञानाची जिज्ञासा तसेच वादविवाद, चर्चा आणि विचारविनिमयासाठी खुले वातावरण यांना प्रोत्साहन देतेः जी किशन रेड्डी
सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांचा केरळातील कलादि येथील विशेष कार्यक्रमात सहभाग
Posted On:
05 NOV 2021 10:58PM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केदारनाथ इथे शिलान्यास आणि विविध विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आले. त्यांनी श्री आदि शंकराचार्य यांच्या समाधीचे उद्घाटन केले आणि श्री आदि शंकराचार्य यांच्या अनावरण केले. तसेच कार्यान्वित आणि सुरु असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांचा आढावा घेत पाहणी केली. पंतप्रधानांनी केदारनाथ मंदिरातही पूजा केली. केदारनाथ धाम इथल्या कार्यक्रमासह देशभरातील बारा ज्योतिर्लिंग आणि चारधाम तसेच अनेक श्रद्धास्थानांवर प्रार्थना आणि उत्सव साजरा करण्यात आला, हे सर्व कार्यक्रम केदारनाथ धाम येथील मुख्य कार्यक्रमाशी जोडले होते.
सांस्कृतिक पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री जी किशन रेड्डी यांनी आज केरळातील कलादी येथील आदि शंकराचार्य मंदिराला भेट दिली आणि केदारनाथ येथे पंतप्रधानांच्या हस्ते होत असलेल्या आदि शंकराचार्य पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहिले.
कलादी हे आदि शंकराचार्य यांचे जन्मस्थळ आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे उद्घाटन झाल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी आधी कलादी येथील जनसमुदायाला संबोधित केले आणि आदि शंकराचार्य यांच्या कार्याबद्दल आपले विचार व्यक्त केले.
आदि शंकराचार्यांनी दिलेली अद्वैताची मूळ शिकवण सर्वसमावेशकता, समानता, ज्ञानाची जिज्ञासा तसेच वादविवाद, चर्चा आणि विचारविनिमयासाठी खुले वातावरण यांना प्रोत्साहन देते, असे केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले. संध्याकाळी केंद्रीय मंत्री सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले आणि कलादी येथील श्री शंकराचार्य संस्कृत विद्यापीठातील संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदि शंकराचार्यांच्या अनेक लोकप्रिय रचनांच्या पठण कार्यक्रमातही भाग घेतला.
हा कार्यक्रम एकाच वेळी अकरा ज्योतिर्लिंगे चार ज्योतिषपीठे आणि बद्रीनाथ, द्वारका, पुरी आणि रामेश्वरम अशा चार धामांमध्ये आयोजित केला होता. सकाळी होणाऱ्या पारंपारिक आरतीनंतर वेदांचे पठण असा हा कार्यक्रम होता. ज्योतिर्लिंगे किवा ज्योतिषपीठांच्या आवारात किंवा आजूबाजूच्या परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.




***
S.Patil/V.Sahajrao/P.Kor
***
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1769650)
Visitor Counter : 237