पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
पेट्रोल आणि डिझेल वरील व्हॅट कमी करण्यासाठी 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा पुढाकार
14 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी व्हॅटमध्ये कोणतीही कपात केलेली नाही
Posted On:
05 NOV 2021 10:41PM by PIB Mumbai
पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर अनुक्रमे पाच आणि दहा रुपयांनी कमी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी त्यानुसार ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल वरील वॅट कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत.
मात्र महाराष्ट्र, दिल्ली एनसीआर, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ, मेघालय, अंदमान आणि निकोबार, झारखंड, ओदिशा, छत्तीसगड, पंजाब आणि राजस्थान या 14 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी पेट्रोल व डिझेल वरील वॅट कमी करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही.
लडाख या केंद्रशासित प्रदेशात पेट्रोलच्या किमती सर्वात कमी म्हणजे 13.43 रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्याखालोखाल कर्नाटक आणि पुदुच्चेरी मध्ये या किमती अनुक्रमे 13.35 व 12.85 रुपयांनी कमी झाल्या आहेत.

डिझेलच्या किमतीही लडाख या केंद्रशासित प्रदेशात सर्वात कमी म्हणजे 19.61 रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्या खालोखाल कर्नाटक आणि पुदुच्चेरी मध्ये डिझेलच्या किमतीत घट झाली आहे.

***
S.Patil/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1769649)