संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण  मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासाठी 7,965 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली.

Posted On: 02 NOV 2021 6:55PM by PIB Mumbai

 

ठळक वैशिष्ट्ये :

  • एचएएल  कडून 12 लाइट युटिलिटी हेलिकॉप्टरच्या खरेदीला मंजुरी
  • नौदलाच्या युद्धनौकांच्या शोध मागोवा आणि सहभाग  क्षमता वाढवण्यासाठी बीईएल कडून Lynx U2 फायर कंट्रोल सिस्टम
  • नौदलाची सागरी टेहळणी क्षमता वाढवण्यासाठी एचएएल कडून डॉर्नियर विमानाच्या मिड लाइफ अद्ययावतीकरणाला मंजुरी
  • नेव्हल गनची जागतिक खरेदी रद्द; शॉर्ट रेंज गन माउंट मध्ये भेल द्वारे उत्पादित बंदुका

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 2 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या बैठकीत संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC)  सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणासाठी आणि कार्यात्मक

गरजांसाठी 7,965 कोटी रुपयांच्या  संपादनाच्या प्रस्तावांसाठी आवश्यकता स्वीकृती (AoN) मंजूर केली.. हे सर्व प्रस्ताव (100%) 'मेक इन इंडिया' अंतर्गत असून त्यात भारतात संरचित, विकास आणि उत्पादन यावर भर देण्यात आला आहे.

देशांतर्गत स्त्रोतांकडून खरेदीच्या महत्त्वाच्या मंजुरींमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कडून बारा लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर्स , भारत  इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) कडून Lynx U2 फायर कंट्रोल सिस्टीम जी नौदलाच्या युद्धनौकांचा शोध आणि सहभाग क्षमता वाढवेल आणि नौदलाची  सागरी शोध आणि तटीय देखरेख  क्षमता वाढवण्यासाठी एचएएल कडून डॉर्नियर विमानाचे मिड लाइफ अपग्रेडेशन यांचा समावेश आहे.

आत्मनिर्भर भारतला आणखी चालना देत, नेव्हल गनची जागतिक खरेदी रद्द करून सुपर रॅपिड गन माउंट (एसआरजीएम) मध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) द्वारे निर्मित बंदुका समाविष्ट करण्यात  येत आहेत. हे एसआरजीएम  तोफा आणि रेंज एक्सटेन्शनचा  वापर करून वेगाने  लक्ष्य गाठण्याची विशिष्ट क्षमता प्रदान करतात. भारतीय नौदलाच्या युद्धनौकांवर त्या बसवल्या जातील.

***

M.Iyengar/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1768981) Visitor Counter : 90