रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

लोटली आणि वेर्णा यांना प्रथम जोडणाऱ्या चौपदरी रस्ते प्रकल्पाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

गोव्यात जल जलवाहतुकीची प्रचंड क्षमता: गडकरी

Posted On: 01 NOV 2021 10:06PM by PIB Mumbai

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रीश्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज नोव्हेंबर 2021 रोजी गोव्यामध्ये  वेर्णा येथे राष्ट्रीय महामार्ग -566 वरील लोटली गाव ते औद्योगिक विकास महामंडळवेर्णा या चौपदरी रस्ते प्रकल्पाचे उद्घाटन केले.3.84 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या माध्यमातून ही गावे प्रथमच थेट जोडली जाणार आहेत. हा रस्ता अंदाजे 184.05  कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी 7.32 किमी आहेआणि हा रस्ता लोटलीपासून सुरु होऊन  वेर्णा औद्योगिक महामंडळाच्या  टायटन गेटपर्यंत जातो. या रस्त्यामुळे पोंडा ते मुरगाव हे अंतर 12 किलोमीटरने  कमी झाले असून यामुळे प्रवासाचा वेळ 30 मिनिटांनी कमी होणार आहे. लोटली ते टायटन गेट पर्यंतच्या संपूर्ण 7.32 किमी लांबी रस्त्याचा  एकूण प्रकल्प खर्च रु. 229.85 कोटी रुपये आहे. .
 


''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करत आहे.गोवा हे एक पर्यटन स्थळ आहे आणि  ते जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ व्हावे अशी माझी इच्छा आहे'', असे श्री नितीन गडकरी यावेळी बोलताना  म्हणाले. सर्व प्रकारचे प्रदूषण कमी होण्यास मदत होण्याच्या दृष्टीने .केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोवा सरकारला 'विजेवर चालणारी सार्वजनिक वाहतूकया संकल्पनेवर काम करण्यास सांगितले.
 


अन्य एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्यांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात टेलिमेडिसिन सेवांचे उद्घाटन केले.नवोन्मेष उद्यमशीलता विज्ञान-तंत्रज्ञानसंशोधनकौशल्य आणि यशस्वी अंमलबजावणी  याला  आपण ज्ञान म्हणतो आणि या ज्ञानाचे संपत्तीमध्ये रूपांतर करणे हे देशाचे भविष्य आहे” असे श्री.  गडकरी म्हणाले.त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ आणि सुविधा मंडळाने आयोजित केलेल्या पंतप्रधान  गती शक्ती उपक्रमांतर्गत उद्योजकांशी  विशेष संवाद साधला.जलवाहतुकीची प्रचंड क्षमता असलेल्या गोव्याने जलवाहतुकीला प्रोत्साहन द्यावेअशी सूचना केंद्रीय रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केली. पर्यटन हे गोव्याचे मूळ बलस्थान असून मूलभूत पायाभूत सुविधांमुळे पर्यटन वाढेलअसे गडकरी यांनी सांगितले. गोव्यात जमीन आणि पाणी या दोन्हीवर चालणारे  सीप्लेनजल क्रीडा   यांसारख्या उपक्रमांना चालना मिळू शकतेअसे ते म्हणालेगडकरी म्हणाले कीभारतातील लॉजिस्टिक खर्च  कमी करणे गरजेचे असून त्यासाठी सागरी वाहतुकीवर अवलंबून असणे आवश्यक आहे. सध्या 70 टक्के वाहतूक रस्तेमार्गे असून त्यापैकी  90 टक्के वाहतूक ही  प्रवासी वाहतूक आहे.आपल्या धोरणाचे पहिले  प्राधान्य जलमार्गदुसरे रेल्वेतिसरे रस्ते आणि नंतर विमान वाहतूक आहे,” असे ते म्हणाले. गडकरी म्हणाले कीराष्ट्रहिताच्या दृष्टीने रस्त्यावरील रहदारी कमी करणे गरजेचे आहे.जिथे गोव्याचा संबंध आहेतिथे नौवहन हे सर्वात महत्त्वाचे आहे आणि भारतात ड्रोन निर्मितीची क्षमता आहे.आम्ही 350 हेली पोर्ट बनवत आहोत आणि हेली रुग्णवाहिका सुरू करून  अवयवदानाला प्रोत्साहन देण्याचा विचार आहेअसे ते म्हणाले.गडकरी म्हणाले कीवैद्यकीय उपकरणांचे उत्पादन हे गोव्यातील एक उत्पादन क्षेत्र बनू शकते.

***

JaydeviPS/ SonalC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1768781) Visitor Counter : 40


Read this release in: English , Urdu , Hindi