शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून शाळांसाठी भाषा संगम उपक्रमाचा प्रारंभ,भाषा संगम मोबाईल ॲप आणि एक भारत श्रेष्ठ भारत या मोबाईल प्रश्नमंजुषा स्पर्धेसही केली सुरुवात
Posted On:
01 NOV 2021 10:39PM by PIB Mumbai
भाषा शिकण्याला औपचारिक गुण समावेशक कौशल्य म्हणून प्रोत्साहन दिले जाईल, असे केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रीय एकता दिवस या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्ताने, विविध शाळांसाठी भाषा संगम, भाषा संगम मोबाइल ॲप आणि एक भारत श्रेष्ठ भारत प्रश्नमंजुषा स्पर्धा ॲप या उपक्रमांचा प्रारंभ करताना सांगितले.
भाषा संगम हा 22 भारतीय भाषांमधील दैनंदिन वापरातील मूलभूत वाक्ये शिकवण्यासाठी 'एक भारत श्रेष्ठ भारत' या अंतर्गत सुरू केलेला शिक्षण मंत्रालयाचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. लोकांनी त्यांच्या मातृभाषेशिवाय इतर भारतीय भाषेतील मूलभूत संभाषण कौशल्ये आत्मसात करावीत ही त्यामागची संकल्पना आहे. आझादी का अमृत महोत्सव या कालावधीत किमान 75 लाख लोकांनी हे कौशल्य आत्मसात करावे, असे आमचे ध्येय आहे.
भाषा संगम अंतर्गत आज सुरू करण्यात आलेले उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत:
- शालेय मुलांसाठी हा असा एक उपक्रम जो दिक्षा ,इ पाठशाला (DIKSHA, ePathshala), यावरून आणि 22 पुस्तिकांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जात आहे.
- भाषा संगम मोबाईल ॲप जे मल्टीभाषी नावाच्या स्टार्टअपने myGov च्या सहकार्याने विकसित केले आहे.
- हे शिक्षण मंत्रालयाच्या नवनिर्मिती विभागाद्वारे नझारा टेक्नॉलॉजीज यांनी विकसित केलेले प्रश्नमंजुषा ॲप असून भारतातील विविध राज्यांवर आधारीत 10,000 प्रश्न या मोबाइल ॲप वर अपलोड करण्यात आले आहेत
***
S.Patil/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1768698)