उपराष्ट्रपती कार्यालय

सुशासन तळागाळापर्यंत पोहोचण्याच्या गरजेवर उपराष्ट्रपती  एम. व्यंकय्या नायडू यांनी दिला भर

Posted On: 01 NOV 2021 9:09PM by PIB Mumbai

 

भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या (आयआयपीए) 67 व्या  वार्षिक सर्वसाधारण सभेच्या  अध्यक्षपदावरून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले कीभारताच्या विकासाचा वेग वाढवून लोकांचे जीवनमान सुधारणे आणि लोकांचे जीवन आनंदी आणि सुखदायक करण्याच्या दृष्टीने सरकार धोरणे तयार करत आहे आणि  यासंबंधित  कार्यक्रमांची आखणी करत आहे.

वितरण प्रणालीतील क्षमता दरी  भरून काढण्यासाठी, भारतीय लोक प्रशासन संस्थेने ,सार्वजनिक प्रशासनाच्या सिद्धांत आणि प्रत्यक्ष कृतीसाठी  समर्पित एक प्रमुख संस्था म्हणून,महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, "देशातील प्रशासन सुधारणांच्या नव्या उर्मीला उत्प्रेरित करण्यासाठी भारतीय लोक प्रशासन संस्था ही  योग्य संस्था आहे."

वर्तमानातील  आणि भविष्यात उद्भवणाऱ्या  आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय लोक प्रशासन संस्था स्वतःमध्ये  परिवर्तन करत आहे,याचा आनंद असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या  मागील वर्षातील कामगिरीचा संदर्भ देताना श्री नायडू यांनी नमूद केले की,भारतीय लोक प्रशासन संस्था ही आता डिजिटल प्रशिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था असून  मिशन कर्मयोगी अभियानाचा  एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे.  2020-21 मध्ये  भारतीय लोक प्रशासन संस्थेने 66 ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित करत  8353 अधिकाऱ्यांना प्रशिक्षित केले.भारतीय लोक प्रशासन संस्थेने ६० संशोधन अभ्यासही पूर्ण केले आहेत आणि चालू घडामोडींवरील  विषयांसंदर्भात  46 वेबिनारही आयोजित केले आहेत. "क्षमता बांधणीसासाठी  भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या वचनबद्धतेचे हे प्रमाण आहे ." असे ते म्हणाले.

उपराष्ट्रपतींनी केंद्रीय मंत्री आणि भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या  कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष डॉ जितेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाची  प्रशंसा केली. भारतीय लोकप्रशासन संस्थाकार्यकारी परिषद ही प्रभावी, कार्यक्षम आणि अधिक प्रातिनिधीक  बनवण्यासाठी, भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या संघटना मसुद्यात आणि नियमांमध्ये गेल्या वर्षभरात अनेक व्यापक सुधारणा करण्यात आल्या, असे त्यांनी सांगितले.

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1768683) Visitor Counter : 161