कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत सरकारमधील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत राबवलेल्या  विशेष मोहिमेच्या फलनिष्पत्तीचा  केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी घेतला आढावा

Posted On: 01 NOV 2021 6:04PM by PIB Mumbai

 

केंद्रीय पंतप्रधान कार्यालयकार्मिक, सार्वजनिक तक्रार, निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, भारत सरकारची  सर्व मंत्रालये/विभागांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा  निपटारा करण्यासाठी 2 ऑक्टोबर रोजी सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेद्वारे  भंगार सामग्री मोडीत काढून केंद्र सरकारला सुमारे ४० कोटी रुपये प्राप्त झाले आणि त्या सामग्रीमुळे नाहक अडवली गेलेली आठ लाख चौरस फुटांपेक्षा जास्त जागा उपलब्ध झाली आहे.

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभाग या नोडल विभागाच्या माध्यमातून 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत, भारत सरकारची  सर्व मंत्रालये/विभागांमध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा  निपटारा करण्यासाठी कार्मिक मंत्र्यांनी  एक ऑक्टोबर रोजी या विशेष मोहिमेची सुरुवात केली होती ही बाब लक्षात घेतली पाहिजे.

या मोहिमेच्या फलनिष्पत्तीबद्दल प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाच्या  उच्च अधिकार्‍यांसह एका विशेष आढावा बैठकीत, डॉ जितेंद्र सिंह यांनी समाधानपूर्वक  नमूद केले की , ही मोहीम सुरु करण्यात आली त्या  उद्देशाने 15 लाख 23 हजार 464 फाईल्सपैकी 13 लाख 73 हजार, 204 पेक्षा जास्त फाईल्सचा निपटारा करण्यात आला. त्याचप्रमाणे, 3,28,234 सार्वजनिक तक्रारींचे उद्दिष्ट असताना, 30 दिवसांच्या अल्प कालावधीत 2,91,692 तक्रारींचे निवारण करण्यात आले.याशिवाय, या कालावधीत निश्चित करण्यात आलेल्या  834 पैकी 685 नियम आणि प्रक्रिया सुलभ करण्यात आल्या.

भारत सरकारची सर्व मंत्रालये/विभागांचे विविध श्रेण्यांमधील  प्रलंबित फायलींचे  प्रमाण कमी करण्याबाबत तुलनात्मक विश्लेषण करण्याचे आणि सर्वोत्तम पद्धती राबवण्याच्या दृष्टीने स्पर्धात्मक वृत्ती वाढवण्यासाठी सर्वांसोबत माहिती सामायिक करण्याच्या सूचनाही  त्यांनी प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाला केल्या.

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग हे या मोहिमेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी नोडल मंत्रालय होते.यासाठी एक समर्पित डॅशबोर्ड तयार करण्यात आला आणि यासंदर्भात तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली मंत्रालयांने  निश्चित केलेल्या मापदंडांनुसार माहिती भरण्यासाठी https://pgportal.gov.in/scdpm  हे समर्पित पोर्टल तयार करण्यात आले असून 22 सप्टेंबर  2021 पासून कार्यान्वित झाले आहे.

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1768586) Visitor Counter : 175