सांस्कृतिक मंत्रालय
आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने जाहीर केल्या तीन अनोख्या स्पर्धा
“अमृत महोत्सवात कला, संस्कृती, गाणी आणि संगीताने रंग भरायला पाहिजे ”: पंतप्रधान
Posted On:
31 OCT 2021 7:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2021
सांस्कृतिक मंत्रालय देशभरात पंचायत/तालुका स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत देशभक्तीपर गीतलेखन, रांगोळी काढणे आणि अंगाई गीत लेखनासाठी स्पर्धा आयोजित करत आहे.
या उपक्रमाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी आपल्या मन की बात या कार्यक्रमातून केली होती आणि सोशल मीडियावर मान्यवर व्यक्तींनी सादर केलेल्या प्रस्तुतिकरणाने या उपक्रमाच्या लोकसहभागासाठी दिनांक 31 ऑक्टोबर 2021 या राष्ट्रीय एकता दिनापासून या स्पर्धेच्या प्रवेशिका स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.
आजादी का अमृत महोत्सव हा, भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी आणि त्याचे संस्मरण करण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम आहे.
दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या आपल्या मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून या उपक्रमाची घोषणा केली होती. "अमृत महोत्सव हा कला, संस्कृती, गाणी आणि संगीताच्या रंगांनी भरलेला असायला हवा" असे पंतप्रधान यावेळी म्हणाले होते. यानिमित्ताने पुढील तीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत ज्यात मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग असेल:
- देशभक्तीपर गीतलेखन
- अंगाई गीत लेखन
- रांगोळी काढणे
सांस्कृतिक मंत्रालय तहसील/तालुका स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत वरील तीनही उपक्रमांसाठी #UnityInCreativity देशव्यापी स्पर्धा आयोजित करत आहे. यात सहभाग नोंदविण्यासाठी तपशीलवार मार्गदर्शक सूचना ( amritmahotsav.nic.in या संकेतस्थळावर (आजादी का अमृत महोत्सव AKAM) उपलब्ध आहेत. या उपक्रमाचा उद्देश हा ‘जन भागीदारी’ च्या विपुल सहभागाला प्रोत्साहन देणे हा आहे. ही स्पर्धा दोन महिने चालेल आणि विजेत्यांना उत्तम बक्षिसे दिली जातील.
* * *
S.Patil/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1768236)
Visitor Counter : 1837