कोळसा मंत्रालय
औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पांना 22 लाख टन कोळशाचा विक्रमी पुरवठा केल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी कोळसा कंपन्यांचे केले कौतुक
Posted On:
30 OCT 2021 6:30PM by PIB Mumbai
कोळसा मंत्रालयाने 28 ऑक्टोबर 2021 ला औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पांना 22 लाख टन कोळशाचा पुरवठा करून उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल केंद्रीय कोळसा, खाण आणि संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
ट्विट संदेशाद्वारे केंद्रीय मंत्री म्हणाले की या एकूण कोळशापैकी 18 लाख टन कोळशाचा पुरवठा कोल इंडिया मर्या. या कंपनीने केला आहे. सर्व कोळसा कंपन्यांचे अभिनंदन करताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी त्यांना अधिकाधिक कोळसा उत्पादन आणि पुरवठा करण्याची विनंती केली
***
Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1767941)
Visitor Counter : 213