केंद्रीय लोकसेवा आयोग
नागरी सेवा (पूर्वपरीक्षा) परीक्षा, 2021 चा निकाल जाहीर भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा, 2021 देण्यासाठी पात्र ठरलेले उमेदवार घोषित
नागरी सेवा (पूर्वपरीक्षा) परीक्षा, 2021 चा निकाल जाहीर
Posted On:
29 OCT 2021 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2021
10 ऑक्टोबर 2021 रोजी झालेल्या नागरी सेवा (पूर्वपरीक्षा ) परीक्षा, 2021 च्या निकालाच्या आधारावर, खालील हजेरी क्रमांक असलेले उमेदवार नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2021 देण्यासाठी पात्र ठरले आहेत.
या उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती आहे. परीक्षेच्या नियमांनुसार, भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षा, 2021 साठी आणि नागरी सेवा (मुख्य) परीक्षेसाठी या सर्व उमेदवारांना तपशीलवार अर्ज-I (डीएएफ -I) मध्ये पुन्हा अर्ज करावा लागेल.डीएएफ -I अर्ज भरण्याच्या तारखा आणि महत्त्वाच्या सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर योग्य वेळी जाहीर केल्या जातील.
उमेदवारांना असेही कळविण्यात येते आहे की, भारतीय वन सेवा (मुख्य) परीक्षेसाठी, नागरी सेवा (पूर्वपरीक्षा) परीक्षा, 2021 द्वारे घेण्यात आलेल्या पडताळणी चाचणीचे गुण, कट ऑफ गुण आणि उत्तरे ही भारतीय वनसेवा परीक्षा, 2021 ची आणि नागरी सेवा परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच भारतीय वन सेवा परीक्षा, 2021 आणि नागरी सेवा परीक्षा 2021चा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर आयोगाचे संकेतस्थळ https://upsconline.nic.in वर अपलोड केली जातील.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकुलात परीक्षा सभागृह इमारतीजवळ एक सुविधा काउंटर आहे. या सुविधा काउंटरच्या माध्यमातून कामकाजाच्या सर्व दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेदरम्यान व्यक्तिगतरित्या भेट देऊन किंवा 011-23385271, 011-23098543 किंवा 011-23381125 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून उमेदवार वर नमूद केलेल्या परीक्षेच्या निकालाबाबत कोणतीही माहिती/स्पष्टीकरण जाणून घेऊ शकतात.केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या https://upsconline.nic.inHYPERLINK "http://www.upsc.gov.in/" या संकेतस्थळाला भेट देऊन उमेदवार त्यांच्या निकालाबाबत माहिती मिळवू शकतात.
निकालासाठी येथे क्लिक करा:
* * *
M.Chopade/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1767740)