सांस्कृतिक मंत्रालय
येत्या पाच नोव्हेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते केदारनाथ इथे आदि शंकराचार्यांच्या समाधीस्थळाचे उद्घाटन
आदि शंकराचार्य यांच्या पुतळ्याचेही पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण
विविध विकास प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण
सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांच्या प्रगतीचाही पंतप्रधान घेणार आढावा
प्रविष्टि तिथि:
29 OCT 2021 2:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी, येत्या 5 नोव्हेंबर रोजी, उत्तराखंड मधील केदारनाथ इथे जाणार आहेत.
पंतप्रधान आपल्या भेटीदरम्यान मंदिरात जाऊन केदारनाथाचे दर्शन घेतील. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते, आदि शंकराचार्यांच्या समाधीस्थळाचे उद्घाटन होईल, तसेच शंकराचार्य यांच्या पुतळ्याचे अनावरण देखील त्यांच्या हस्ते होईल. 2013 साली आलेल्या प्रचंड प्रलयात ही समाधी उध्वस्त झाली होती, त्यानंतर नव्याने ती बांधण्यात आली आहे. हे संपूर्ण पुनर्निर्माणाचे कार्य पंतप्रधानांच्या देखरेखीखाली झाले आहे.
पंतप्रधान सरस्वती आस्थापथाच्या कामाचाही आढावा घेतील आणि सध्या सुरु असलेल्या कामाची तपासणी करतील.
त्यानंतर पंतप्रधान सार्वजनिक सभेलाही संबोधित करतील. तसेच, केदारनाथ इथे पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होईल. यात, सरस्वती काठाला लागून असलेला भक्तिमार्ग आणि घाट, मंदाकिनी नदीला लागून असलेला भक्तिमार्ग, तीर्थ पुरोहितांची घरे आणि मंदाकिनी नदीवर बांधलेला गरुड छत्ती पूल या कामांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांसाठी 130 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च झाला आहे.
तसेच 180 कोटी रुपयांच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन देखील पंतप्रधानांच्या हस्ते होईल. यात, संगम घाटाचे नूतनीकरण, पर्यटक सुविधा आणि प्रथमोपचार केंद्र, प्रशासकीय कार्यालय आणि रुग्णालय, दोन अतिथीगृह, पोलीस स्थानके, आदेश आणि नियंत्रण केंद्र, मंदाकिनी भक्तिमार्ग मार्गिका व्यवस्थापन आणि पाऊस निवारा तसेच, सरस्वती नागरी सुविधा इमारत, अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे.
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1767482)
आगंतुक पटल : 256