गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत किनारी सुरक्षेबाबत सल्लागार समितीची बैठक

Posted On: 28 OCT 2021 7:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  28 ऑक्टोबर 2021

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली, आज नवी दिल्लीत किनारी सुरक्षा व्यवस्थेविषयक सल्लागार समितीची बैठक झाली. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि अजय मिश्रा, केंद्रीय गृहसचिव, मस्त्यपालन सचिव, भारतीय तटरक्षक दल आणि गृहमंत्रालयाचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

गृहमंत्रालय किनारी सुरक्षेच्या बाबतीत येणाऱ्या आव्हानांचे गांभीर्याने अध्ययन करत आहे, असे अमित शाह यावेळी म्हणाले. या बैठकीत दिलेल्या सूचनांचा विचार करुन, सर्व राज्यांच्या मदतीने, किनारी सुरक्षा अभेद्य बनवण्यासाठी योग्य आणि आवश्यक ती पावले उचलली जाणार आहेत. पहिल्यांदाच भारतातील सर्व बेटांचे सर्वेक्षण केले जात आहे  आणि या सर्वेक्षणानंतर मिळालेल्या अहवालांच्या आधारे अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत.

किनारी सुरक्षेत अनेक मंत्रालये आणि यंत्रणांची भूमिका महत्वाची असते, असे सांगतत्यांच्यात समन्वय निर्माण करून लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली सर्व हितसंबंधियांची बैठक घेऊन किनारी सुरक्षा अधिक मजबूत केली जाईल, असेही अमित शाह म्हणाले.

बैठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली आणि किनारी सुरक्षा भुसुरक्षेच्या पातळीवर मजबूत करण्याविषयी सूचना देण्यात आल्या.बैठकीला उपस्थित सदस्यांनी सर्व राज्यांमध्ये किनारी सुरक्षेसाठी वेगळे पोलीस दल  स्थापन केले  जावे आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने, बेटे तसेच किनारी मार्गांवर देखरेख ठेवावी अशी सूचना केली.

 

 M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1767316) Visitor Counter : 170