अर्थ मंत्रालय

आशियायी पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेच्या प्रशासक मंडळाच्या 6 व्या वार्षिक बैठकीत वित्तमंत्री निर्मला सीतारामन सहभागी

Posted On: 26 OCT 2021 8:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  26 ऑक्टोबर 2021

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्रीमती. निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्ली येथून  दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आशियायी पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेच्या (एआयआयबी ) प्रशासक मंडळाच्या 6 व्या  वार्षिक बैठकीत सहभाग घेतला.

दरवर्षी होणाऱ्या वार्षिक बैठकीत ,आशियायी पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेशी संबंधित महत्त्वाच्या बाबींवर आणि भविष्यातील दृष्टीकोनांसंदर्भात  प्रशासक मंडळाकडून प्रमुख निर्णय घेतले जातात. भारत हा आशियायी पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचा  संस्थापक सदस्य आणि दुसरा सर्वात मोठा भागधारक आहे. भारतात  आशियायी पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे विविध  वित्तीय प्रकल्प आहेत. या वर्षीची वार्षिक बैठक आशियायी पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक आणि संयुक्त अरब अमिराती सरकारद्वारे संयुक्तपणे गुंतवणूक आज आणि परिवर्तन उद्या या संकल्पनेवर आयोजित करण्यात आली होती. 

सध्याचे संकट आणि वाढत्या हवामानाच्या संकटामुळे बहुपक्षीय विकास बँकांचे (एमडीबी )महत्त्व आणि बहुपक्षीय विकास वित्तपुरवठा देशाच्या प्रयत्नांना पूरक ठरण्याची निकड वाढली आहे, याकडे श्रीमती सीतारामन यांनी लक्ष वेधले. या संदर्भात बोलताना त्यांनी , सर्वसमावेशक आणि हरित विकासासाठी खाजगी क्षेत्रातील भांडवल एकत्रीकरण अधिक व्यापक करण्यासाठी  सामाजिक पायाभूत सुविधा क्षेत्रातील मालमत्ता  निर्मिती आणि विकासामध्ये गुंतवणुकीच्या संधी शोधण्याची गरज तसेच जबाबदारी, पारदर्शकता आणि कार्यान्वयन आणि गुंतवणुकीची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी निवासी मंडळ आणि प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्यासह  बँकेकडून असलेल्या काही अपेक्षा अधोरेखित केल्या.

श्रीमती.सीतारामन यांनी एक अग्रगण्य वित्तीय संस्था म्हणून आशियायी पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी भारताच्या सहकार्याची आणि समर्थनाची ग्वाही दिली.

 

 M.Chopade/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1766747) Visitor Counter : 247


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali