संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बांगलादेशचे नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल एम शाहीन इकबाल यांचा भारत दौरा

Posted On: 25 OCT 2021 6:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  25 ऑक्टोबर 2021

बांगलादेशचे नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल एम शाहीन इकबाल 23–29 ऑक्टोबर 2021 या कालावधीत भारत  दौऱ्यावर आहेत. अ‍ॅडमिरल एम शाहीन इकबाल, नवी दिल्लीत भारताचे नौदल प्रमुख, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ तसेच भारत सरकारच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. या द्विपक्षीय चर्चेदरम्यान, आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेवर समन्वित गस्त,दोन्ही देशांचा बोंगोसागर हा संरक्षण विषयक सराव, नौदल प्रशिक्षण, प्रतिनिधी मंडळांच्या परस्पर देशांना भेटी यासारख्या संयुक्त सहकार्य उपक्रमांसह इतर मुद्यांवर या वेळी चर्चा होईल.

दिल्लीनंतर अ‍ॅडमिरल शाहीन इकबाल  मुंबईला भेट देणार असून पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ, व्हाईस अ‍ॅडमिरल  आर हरी कुमार यांची भेट घेतील. त्यानंतर वेलिग्टन इथल्या संरक्षण सेवा महाविद्यालयाला भेट देऊन ते प्रशिक्षण कार्याची पाहणी करतील आणि आणि कमान्डंट समवेत संवादही साधतील.

भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये इतिहास,भाषा, संस्कृती यांचे समानतेचे बंध आहेत. धोरणात्मक संबंधापलीकडे जाणाऱ्या आणि  सार्वभौमत्व, समानता, विश्वास यावर आधारित भागीदारीतून उत्कृष्ट द्विपक्षीय संबंधांचे दर्शन घडत  आहे.  भारत आणि बांगलादेश यावर्षी, बांगलादेश मुक्ती  युद्धाच्या विजयाचा सुवर्णमहोत्सव संयुक्तपणे साजरा करत आहेत.यानिमित्त अनेक संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून दोन्ही देशांच्या नौदलाच्या युद्धनौकांनी परस्पर देशांना भेटी दिल्या, बांगला देश  सशस्त्र दलाच्या पथकाने, नवी दिल्लीत  2021 च्या प्रजासत्ताक दिन संचलनात भाग घेतला.2021 च्या शेवटच्या तिमाहीत नौदल वॉर कॉलेज आणि भारतीय नौदल अकादमी मध्ये बांगलादेशच्या माजी सैनिकांसमवेत संवाद आणि भारतीय  सशस्त्र बल पथक आणि बॅन्ड बांगलादेश मध्ये विजय दिवस  समारंभात सहभागी  होण्याची योजना आखण्यात आली आहे.

 

M.Iyengar/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1766366) Visitor Counter : 248