अर्थ मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2020-21 च्या सातव्या मालिकेतील रोखे विक्रीची किंमत
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                23 OCT 2021 12:57PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                 
भारत सरकारने 21 ऑक्टोबर 2021 रोजी जारी केलेल्या अधिसूचना क्र. 4(5)-बी (डब्ल्यू अँड एम) नुसार, सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2021-22 च्या सातव्या मालिकेतील सुवर्ण रोख्यांची खरेदी 25 ते 29 ऑक्टोबर 2021 या कालावधीत खुली होणार आहे. या योजनेच्या सेटलमेंटची तारीख 2 नोव्हेंबर 2021 आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने 22 ऑक्टोबर2021 रोजी प्रसिध्द केलेल्या पत्रकातील माहितीनुसार रोखे खरेदीसाठी ठरवून दिलेल्या कालावधीत प्रत्येक रोख्याची किंमत प्रत्येकी 1 ग्रॅम सोन्यासाठी 4,765 रुपये (रुपये चार हजार सातशे पासष्ठ फक्त) इतकी असेल.  
जे गुंतवणूकदार या रोख्यांच्या खरेदीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतील आणि डिजिटल पद्धतीने त्याचे पैसे भरतील त्यांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सवलत देण्याचा निर्णय भारत सरकारने रिझर्व बँकेशी विचारविनिमय करून घेतला आहे. अशा गुंतवणुकदारांसाठी या सुवर्ण रोख्यांची किंमत प्रत्येकी 1 ग्रॅम सोन्यासाठी 4,715 रुपये( रुपये चार हजार सातशे पंधरा फक्त) इतकी असेल.
***
R.Aghor/S.Chitnis/P.Kor
*** 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: 
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1765959)
                Visitor Counter : 304