भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

पोटनिवडणुकीदरम्यान संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी

Posted On: 21 OCT 2021 7:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  21 ऑक्टोबर 2021

आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे की पत्र क्रमांक 437/6/INST/2016-CSS दिनांक 29 जून, 2017 मध्ये नमूद निर्देशाच्या संदर्भात, आणि पत्र क्र. 437/6/1/ECI/INST/FUNCT/MCC/2017 दिनांक 18 जानेवारी, 2018 मध्येही ज्याचा पुनरुच्चार करण्यात आला आहे की जर मतदारसंघ राज्य राजधानी/महानगर शहरे/महानगरपालिका मध्ये येत  असेल तर आदर्श आचारसंहिता सूचना  केवळ संबंधित मतदारसंघाच्या क्षेत्रात लागू होईल. अन्य सर्व प्रकरणांमध्ये, उपरोक्त सूचना पोटनिवडणूक होणाऱ्या मतदारसंघाचा समावेश असलेल्या संपूर्ण जिल्ह्यात  लागू केल्या जातील.

या सूचनांचा गर्भित अर्थ असा आहे की विकासात्मक आणि प्रशासकीय कामे आदर्श आचारसंहिता असली तरी  चालू ठेवली पाहिजेत आणि पोटनिवडणुकीचा प्रचार केवळ संबंधित  मतदारसंघात मर्यादित ठेवला पाहिजे.

मात्र अशी परिस्थिती उदभवत आहे की ज्यात सध्या चालू असलेल्या पोटनिवडणुकीशी संबंधित राजकीय उपक्रम पीसी/एसीच्या बाहेर परंतु  जिल्ह्यातच आयोजित केले जातात. असे उपक्रम उपरोक्त सूचनांच्या  विरुद्ध असतील. म्हणूनच  हे आणखी स्पष्ट केले आहे की जर पोटनिवडणुकीशी संबंधित कोणताही  निवडणूक प्रचार जिल्ह्यात कुठेही आयोजित केला असेल  तर आदर्श आचारसंहिता कोविड आणि खर्चावरील देखरेखीच्या अंमलबजावणीशी संबंधित सर्व सूचना राजकीय उपक्रमांप्रमाणे  लागू होतील. संबंधित जिल्हा निवडणूक अधिकारी अशा प्रकरणांमध्ये सर्व आवश्यक कारवाई करतील आणि काटेकोर पालन सुनिश्चित करतील

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1765571) Visitor Counter : 337


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu