PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
17 OCT 2021 5:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 17 ऑक्टोबर 2021
- 97.65 Cr. vaccine doses have been administered so far under Nationwide Vaccination Drive
- 14,146 new cases in the last 24 hours; lowest in 229 days
- Recovery Rate currently at 98.10%; Highest since March 2020
- 19,788 recoveries in the last 24 hours increases Total Recoveries to 3,34,19,749
- Active cases account for less than 1% of total cases, currently at 0.57%; Lowest since March 2020
- India's Active caseload stands at 1,95,846; lowest in 220 days
- Weekly Positivity Rate (1.42%) less than 3% for last 114 days
- Daily positivity rate (1.29%) less than 3% for last 48 days
- 59.09 cr Total Tests conducted so far
|
#Unite2FightCorona #IndiaFightsCorona
PRESS INFORMATION BUREAU
MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING
GOVERNMENT OF INDIA
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या 41,20,772 मात्रा देण्यात आल्यामुळे, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंध लसीच्या मात्रांच्या एकूण संख्येने 97.65 कोटी मात्रांचा (97,65,89,540) टप्पा पार केला आहे. देशभरात 96,46,485 सत्रांच्या आयोजनातून हे लसीकरण साध्य करण्यात आले.
आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे.
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
1,03,75,835
|
2nd Dose
|
90,75,869
|
FLWs
|
1st Dose
|
1,83,61,737
|
2nd Dose
|
1,55,14,198
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
39,26,91,878
|
2nd Dose
|
11,02,63,827
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
16,76,26,429
|
2nd Dose
|
8,58,84,392
|
Over 60 years
|
1st Dose
|
10,56,78,041
|
2nd Dose
|
6,11,17,334
|
Total
|
97,65,89,540
|
गेल्या 24 तासात 19,788 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे देशात (महामारीला प्रारंभ झाल्यापासून) आतापर्यंत कोविड -19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या 3,34,19,749 झाली आहे.
परिणामी, सध्या भारतातील रोगमुक्ती दर 98.10 % आहे. मार्च 2020 पासून आतापर्यंतच्या कालावधीतील हा उच्चांकी रोगमुक्ती दर आहे.
केंद्र सरकार तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकार यांच्या शाश्वत आणि सहयोगात्मक प्रयत्नांमुळे गेले सलग 112 दिवस नोंदल्या जाणाऱ्या नव्या कोविड बाधितांची संख्या 50,000 पेक्षा कमी असण्याचा कल कायम आहे.
गेल्या 24 तासात 14,146 नव्या कोविडग्रस्त रुग्णांची नोंद झाली. गेल्या 229 दिवसांतली ही सर्वात कमी संख्या आहे.
सक्रीय रुग्णसंख्या 2 लाखांच्या खाली आणि सध्या 1,95,846 इतकी आहे जी 220 दिवसांतील सर्वात कमी संख्या आहे. सक्रीय रुग्णसंख्या सध्या देशातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 0.57 % इतकी आहे.
देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याच्या क्षमता विस्ताराचे काम जारी आहे.
गेल्या 24 तासात देशात एकूण 11,00,123 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत सुमारे 59.09 कोटी (59,09,35,381) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.42 % असून गेले 114 दिवस हा दर 3 % हून कमी राहिला आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर आज 1.29 % आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर गेले सलग 48 दिवस 3 % हून कमी आहे आणि आता गेले सलग 131 दिवस हा दर 5 % हून कमी राहिला आहे.
इतर अपडेटस्
केंद्र सरकारने आतापर्यंत 101.7 कोटींपेक्षा जास्त (1,01,78,96,755) लसींच्या मात्रा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना मोफत आणि थेट राज्याद्वारे खरेदी प्रक्रियेच्या अर्थात सर्व स्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे 10.42 कोटी (10,42,45,455) न वापरलेल्या मात्रा अजूनही शिल्लक आहेत.
Important Tweets
***
N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1764569)
Visitor Counter : 161