श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

4 कोटींपेक्षा अधिक असंघटित कामगारांची ई – श्रम पोर्टलवर नोंदणी, असंघटित कामगारांवरील भारताचा पहिला राष्ट्रीय डेटाबेस


कृषी आणि बांधकाम क्षेत्रातील कामगारांची मोठ्या संख्येने नोंदणी

ई – श्रम मध्ये नोंदणी केल्यास असंघटित कामगारांना सरकारी योजनांचा लाभ सहज मिळू शकेल : भूपेंद्र यादव

Posted On: 17 OCT 2021 12:44PM by PIB Mumbai

 

दोन महिन्यांपेक्षा कमी काळात, 4 कोटींपेक्षा अधिक कामगारांनी ईश्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे मंत्री भूपेंद्र यादव यांनी द्विट द्वारे ही माहिती दिली. ते म्हणाले, नोंदणी करून असंघटित कामगारांना सरकारी योजनांचा लाभ सहज मिळू शकेल.

बांधकाम, वस्त्रोद्योग, मासेमारी, गिग आणि प्लॅटफॉर्म(ई-कंपन्या)  काम, रस्त्यावरील विक्री, घरगुती काम, शेती आणि संलग्न, वाहतूक क्षेत्र अशा विविध व्यवसायातील कामगारांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे. यापेकी काही क्षेत्रांमध्ये स्थलांतरित कामगारांचा देखील समावेश आहे. स्थलांतरित कामगारांसह सर्व असंघटित कामगार आता ईश्रम पोर्टलवर केलेल्या नोंदणीच्या माध्यमातून विविध सामाजिक सुरक्षा आणि रोजगारावर आधारित योजनांचा लाभ घेऊ शकतात.

ताज्या अद्ययावत माहितीनुसार कामगारांनी (77 %) खूप मोठ्या प्रमाणात सीएससी द्वारे आपली नोंदणी केली आहे. सीएससीचा प्रसार कमी सुविधा असलेल्या क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण घटक म्हणून पाहिला जात आहे.

कामगारांना पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी त्यांच्या जवळच्या सीएससीला भेट देण्यास प्रोत्साहित केले जाते आणि या योजनेचा लाभ त्यांनी घ्यावा, जेणेकरून विविध कल्याणकारी कार्यक्रम राबविताना अखेरच्या व्यक्तीपर्यंत ते पोचविणे सहज शक्य होऊ शकेल.

***

M.Chopade/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1764507) Visitor Counter : 364