अर्थ मंत्रालय

प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवरुन दोन कोटींपेक्षा अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे भरली गेली

Posted On: 14 OCT 2021 5:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  14 ऑक्टोबर 2021

प्राप्तिकर विभागाच्या ई-फाईलिंग पोर्टल (www.incometax.gov.in) च्या माध्यमातून 13  ऑक्टोबर 2021 पर्यंत, दोन कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल करण्यात आली आहेत. या नव्या पोर्टलची सुरुवात, सात जून 2021 ला झाली होती. सुरुवातीला करदात्यांना या पोर्टलवर विवरणपत्रे भरतांना अनेक अडचणी आणि त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पोर्टलवर येत असलेले अनेक तांत्रिक अडथळे दूर करण्यात आले असून आता पोर्टलचे कार्यान्वयन सुरळीत सुरु झाले आहे.

13 ऑक्टोबर, 2021 पर्यंत 13.44 कोटींपेक्षा अधिक करदात्यांनी या पोर्टलवर लॉग इन केले आहे. साधारणपणे, 54.70 लाख करदात्यांना ‘फरगॉट पासवर्ड’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती, जिच्या माध्यमातून त्यांना आपले पासवर्ड मिळवता आले आहेत.

 सर्व प्राप्तिकर विवरणपत्रे ई-फायलिंगसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. आर्थिक वर्ष 2021-22 साठी आतापर्यंत दोन कोटींपेक्षा अधिक लोकांनी आतापर्यंत प्राप्तिकर विवरणपत्रे (आयटीआर) भरली आहेत. यात सुमारे 86% आयटीआर 1 आणि  4 फॉर्म्स आहेत. यापैकी, 1.70 कोटी आयटीआरची पडताळणी पूर्ण झाली आहे.त्यापैकी1.49 कोटी आयटीआरची पडताळणी, आधार ओटीपीच्या माध्यामतून करण्यात आली आहे. आधार ओटीपी आणि इतर पद्धती केलेली पडताळणी प्राप्तिकर विभागासाठी महत्वाची आहे, कारण त्याच्याच माध्यमातून करपरतावेही दिले जातात.

ज्या करदात्यांनी आतापर्यंत आपली 2021-22 ची करविवरण पत्रे भरली नाहीत, त्यांनी ती भरावीत, असे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे.

 

M.Chopade/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1763945) Visitor Counter : 206