वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

भारतातील घाऊक किमतीवर आधारित निर्देशांकाची सप्टेंबर, 2021 महिन्यासाठीची आकडेवारी (आधार वर्ष: 2011-12)

Posted On: 14 OCT 2021 4:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  14 ऑक्टोबर 2021

वाणिज्य सल्लागार, उद्योग व अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, यांचे कार्यालय भारतात घाऊक किमतीवर आधारित निर्देशांकाची सप्टेंबर, 2021 महिन्यासाठीची आकडेवारी (आधार वर्ष: 2011-12), जाहीर करत आहे. या प्रसिद्धी पत्रकात ऑगस्ट, 2021ची प्राथमिक आकडेवारी असून जुलै, 2021 ची आकडेवारी अंतिम आहे. घाऊक किंमत निर्देशांक (संदर्भ) महिन्यातील दोन आठवड्याच्या अंतराने तसेच संस्थात्मक स्रोतांकडून व देशभरातील निवडक उत्पादक कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर प्रत्येक महिन्याच्या 14 तारखेला (अथवा पुढच्या कामकाजाच्या दिवशी) जाहीर केला जातो. दहा आठवड्यानंतर अंतिम निर्देशांक जाहीर केला जातो आणि त्यानंतर तो गोठवला जातो.

सप्टेंबर 2021 महिन्यासाठीचा वार्षिक किमंत निर्देशांक 10.66%  इतका आहे. (सप्टेंबर 2020 च्या तुलनेत). सप्टेंबर 2020 मध्ये हा निर्देशांक 1.32% इतका होता. सप्टेंबर 2021 मध्ये चलनफुगवट्याचा दर अधिक असण्याचे कारण म्हणजे, खनिज तेले, मूळ धातू, खाद्येतर वस्तू, खाद्य उत्पादने, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू, रसायने आणि रासायनिक उत्पादने इत्यादींच्या दरात झालेली वाढ हे आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात, असलेल्या दरांच्या तुलनेत हे दर अधिक आहे. घाऊक किमतीवर आधारीत निर्देशांकाची गेल्या तीन महिन्यातली आकडेवारी खाली दिली आहे. 

Index Numbers & Annual Rate of Inflation (Y-o-Y in %) *

All Commodities/Major Groups

Weight (%)

July-21 (F)

Aug-21 (P)

Sept-21 (P)

Index

Inflation

Index

Inflation

Index

Inflation

All Commodities

100

135.0

11.57

135.9

11.39

136.0

10.66

I Primary Articles

22.6

154.3

6.34

155.8

6.20

154.9

4.10

   II Fuel & Power

13.2

115.2

27.01

116.0

26.09

114.7

24.81

   III Manufactured Products

64.2

132.3

11.46

133.0

11.39

133.8

11.41

Food Index

24.4

159.4

4.52

159.6

3.43

159.8

1.14

घाऊक किमतीवर आधारित निर्देशांकातला सप्टेंबर 2021 महिन्यासाठीचा मासिक स्तरावरील बदल (ऑगस्ट 2021 च्या तुलनेत) 0.07 % इतका आहे. घाऊक किमतीवर आधारित निर्देशांकातला, गेल्या सहा महिन्यातला बदल खालील तक्त्यातील आकडेवारीत दिला आहे:

Month Over Month (M-o-M in %) change in WPI Index#

All Commodities/Major Groups

Weight

Apr-21

May-21

Jun-21

Jul-21

Aug-21 (P)

Sep-21 (P)

All Commodities

100.00

1.62

0.68

0.60

0.97

0.67

0.07

   I Primary Articles

22.62

2.78

-0.86

1.86

0.85

0.97

-0.58

   II Fuel & Power

13.15

-0.27

0.83

0.82

4.07

0.69

-1.12

   III Manufactured Products

64.23

1.56

1.23

0.08

0.53

0.53

0.60

Food Index

24.38

3.18

0.00

-0.06

0.44

0.13

0.13

घाऊक किमतीवर आधारित निर्देशांकातील महत्वाच्या गटातील मासिक बदल:

i.प्राथमिक वस्तू (वजन 22.62%): - या महत्वाच्या वस्तूंच्या  निर्देशांकानुसार, वस्तूंच्या किमतीत घट झाली आहे. सप्टेंबर 2021 (-0.58%) पासून ते 154.9 (तात्पुरती) ऑगस्ट महिन्यासाठी 155.8 (तात्पुरती).

ii.इंधन आणि ऊर्जा (वजन 13.15%): - या महत्वाच्या गटातल्या निर्देशांकानुसार, किमतीत सप्टेंबर महिन्यात 114.7 म्हणजे (-1.12%) इतका होता. ऑगस्ट महिन्यात हा दर 116.0 इतका आहे.

iii.उत्पादित वस्तू (वजन 64.23%): - या गटासाठीच्या निर्देशांकानुसार यातील महत्वाच्या वस्तूंची किंमत ऑगस्टच्या तुलनेत, सप्टेंबर महिन्यात 0.60% वाढून 133.8 झाली आहे. ऑगस्ट महिन्यात, हा दर 133.0 इतका होता. या उत्पादित वस्तूंपैकी, चार गटातल्या वस्तूंच्या किमतीत घट झालीये आहे तर एका गटातील वस्तूंच्या किमतीत ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत काहीही बदल झालेला नाही.

घाऊक किमतीवर आधारित अन्नधान्याच्या किमती (वजन 24.38%): खाद्यपदार्थाशी संबंधित प्राथमिक वस्तूंच्या किमती, आणि तयार उत्पादनांपैकी खाद्यपदार्थ गटातील काही वस्तूंच्या किमती, ऑगस्ट महिन्यात, 159.6 होत्या, त्यात सप्टेंबर महिन्यात किंचित वाढ होऊन, त्या 159.8 इतक्या झाल्या आहेत. घाऊक किमतीवर आधारित  खाद्यपदार्थांच्या किमती, ऑगस्ट महिन्यात, 3.43% इतका होता, तो सप्टेंबर महिन्यात, 1.14% पर्यंत कमी झाला आहे.

जुलै 2021 महिन्यातला अंतिम निर्देशांक,(आधारभूत वर्ष: 2011-12=100):

जुलै महिन्यात, घाऊक किमतीवर आधारित निर्देशांक आणि सर्व वस्तूंसाठीचा महागाई दर, (आधारभूत वर्ष: 2011-12=100) अनुक्रमे, 135.0 आणि 11.57 % इतका आहे. अखिल भारतीय घाऊक किमतीवर आधारित निर्देशांक आणि विविध वस्तूंचे सप्टेंबर महिन्यातील महागाई दर परिशिष्ट I मध्ये दिले आहे.

घाऊक किमतीवर आधारित निर्देशांकानुसार वार्षिक तुलनेत, महागाई दर आणि सहा महिन्यातील दर परिशिष्ट  II मध्ये आहे.  खाद्येतर वस्तूंच्या घाऊक किमतीवर आधारित निर्देशांकातील वस्तूंचे सहा महिन्यातील दर, परिशिष्ट III मध्ये आहेत.

प्रतिसाद दर : सप्टेंबर माहिन्यात घाऊक किमतीवर आधारित निर्देशांक 83 टक्क्यांच्या प्रतिसादानुसार संकलित करण्यात आला आहे. तर, जुलै महिन्यातील अंतिम आकडेवारी, 94 टक्क्यांवर आधारलेली आहे. घाऊक किमतीवर आधारित निर्देशांकाची ही तात्पुरती आकडेवारी असून, त्यात नंतर बदल होऊ शकतील. या प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या वस्तू आणि महागाई दराची आकडेवारी मंत्रालयाच्या संकेतस्थळावर http://eaindustry.nic.in उपलब्ध आहे.

प्रसिद्धी पत्रकाची पुढील तारीख: घाऊक किमतीवर आधारित निर्देशांकाचे सप्टेंबर, 2021 साठीचे आकडे 15/11/2021रोजी जाहीर केले जातील.

All India Wholesale Price Indices and Rates of Inflation (Base Year: 2011-12=100) for September, 2021

Commodities/Major Groups/Groups/Sub-Groups/Items

Weight

Index (Latest Month) *

Latest month over month (MoM)

Cumulative Inflation (YoY)

WPI Based rate of Inflation (YoY)

2020-2021

2021-2022*

2020-2021

2021-2022*

Sept-2020

Sept- 2021*

ALL COMMODITIES

100.00

136.0

0.74

0.07

-0.88

11.58

1.32

10.66

I. PRIMARY ARTICLES

22.62

154.9

1.43

-0.58

0.73

7.37

4.06

4.10

A. Food Articles

15.26

160.5

3.31

-0.25

4.17

0.93

8.37

-4.69

Cereals

2.82

159.3

-1.50

0.82

0.83

-1.89

-3.73

1.21

Paddy

1.43

162.0

-0.24

0.12

3.35

-1.69

1.91

-1.82

Wheat

1.03

156.7

-2.72

1.82

2.33

-1.07

-5.24

4.47

Pulses

0.64

178.9

2.57

2.58

11.62

10.27

12.53

9.42

Vegetables

1.87

178.2

24.38

-3.10

6.33

-13.52

38.12

-32.45

Potato

0.28

190.2

15.61

-1.96

74.28

-36.68

118.66

-48.95

Onion

0.16

220.4

57.79

-4.92

-13.69

26.59

-31.64

-1.91

Fruits

1.60

147.6

-5.92

-2.12

-0.78

6.42

-4.59

-1.27

Milk

4.44

156.8

0.98

0.00

5.07

2.23

5.56

1.95

Eggs, Meat & Fish

2.40

158.5

-1.76

-0.13

4.08

7.79

4.15

5.18

B. Non-Food Articles

4.12

161.1

-0.80

-0.31

-3.11

22.30

-1.81

29.40

Oil Seeds

1.12

235.0

-0.19

-1.92

2.49

41.48

0.65

51.13

C. Minerals

0.83

187.4

-13.19

-2.34

0.99

17.29

-6.01

28.80

D. Crude Petroleum & Natural Gas

2.41

97.0

-6.65

-4.06

-27.70

50.52

-23.41

43.92

    Crude Petroleum

1.95

97.1

-9.02

-4.90

-32.38

85.79

-24.97

71.86

II. FUEL & POWER

13.15

114.7

-0.11

-1.12

-13.32

27.34

-8.65

24.81

LPG

0.64

114.8

0.27

4.46

-8.80

41.30

3.19

54.30

Petrol

1.60

114.9

1.23

-2.96

-19.57

57.71

-12.40

54.85

HSD

3.10

118.1

-2.87

-2.15

-21.10

52.48

-16.88

51.80

III. MANUFACTURED PRODUCTS

64.23

133.8

0.59

0.60

0.62

10.99

1.87

11.41

Mf/o Food Products

9.12

158.5

0.64

0.70

5.10

13.38

4.92

12.65

Vegetable And Animal Oils and Fats

2.64

187.9

2.39

-0.27

14.83

43.22

18.67

36.85

Mf/o Beverages

0.91

126.9

-1.12

-0.08

1.36

0.99

0.00

2.42

Mf/o Tobacco Products

0.51

161.3

1.50

0.62

2.18

1.95

0.45

3.86

Mf/o Textiles

4.88

132.7

0.53

0.38

-3.88

14.20

-3.40

16.81

Mf/o Wearing Apparel

0.81

143.7

0.58

1.20

-0.31

2.67

-0.36